AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mask Kissing | मास्क लावून ‘किस’ करणं सुरक्षित आहे का? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

सध्या संपूर्ण जगतात कोरोनाचा कहर सुरु आहे. संपूर्ण जग या विषाणूशी दोन हात करत आहे. मात्र या भयाण वातावरणात ही सेलिब्रिटींनी ‘मास्क किसिंग’ (Mask Kissing) हा एक नवीन ट्रेंड लोकप्रिय केला आहे.

Mask Kissing | मास्क लावून ‘किस’ करणं सुरक्षित आहे का? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात...
मास्क किसिंग
| Updated on: May 20, 2021 | 11:23 AM
Share

मुंबई : सध्या संपूर्ण जगतात कोरोनाचा कहर सुरु आहे. संपूर्ण जग या विषाणूशी दोन हात करत आहे. मात्र या भयाण वातावरणात ही सेलिब्रिटींनी ‘मास्क किसिंग’ (Mask Kissing) हा एक नवीन ट्रेंड लोकप्रिय केला आहे. अलीकडेच अमेरिकेच्या उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि ‘सेकंड जेंटलमन’ डग एम्हॉफ यांनी वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाण करण्यापूर्वी विमानतळावर एकमेकांचे चुंबन घेतले. यावेळी त्यांनी मास्क परिधान केले होते आणि मास्क असतानाच त्यांनी एकमेकांचे चुंबन घेतले (Mask Kissing New trend in Corona Pandemic situation is it safe or not know the answer).

अभिनेता वरुण सूद याने देखील दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर त्याची मैत्रीण दिव्या अग्रवालला मास्क लावून चुंबन घेतले होते, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

यामुळे एक मोठा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे, तो म्हणजे अर्धवट लसीकरण झालेल्या जगात असे करणे खरंच सुरक्षित आहे काय? चला तर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे, ते पाहू या.

‘म्युच्युअल मास्किंग’ हवीच!

दिल्लीस्थित शांता फर्टिलिटी सेंटरच्या स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ. अनुभा सिंग म्हणतात,”लक्षात ठेवा, एक मास्क आपल्या श्वसनाच्या थेंबांच्या प्रसाराला मर्यादित ठेवतो आणि त्याद्वारे दुसर्‍या व्यक्तीचे संरक्षण देखील करतो. खरंच कोरोना होण्याचा धोका कमी करण्यासाठी, दोन्ही व्यक्तींनी मास्क घालायचाच आहे अर्थात ‘म्युच्युअल मास्किंग’ ठेवायचीच आहे. परंतु हे प्रत्येकासाठीच काम करणारे धोरण असू शकेल असे नाही.

डॉ. सिंह पुढे म्हणाल्या, “मास्क योग्य प्रकारे कसे लावायचे, त्याचा उपयोग काय, हे काळात नाही योपर्यंत ते तुम्हाला कंडोमसारखे वाटतील. आणि तो पर्यंत लोक 100 टक्के सुरक्षित राहणार नाहीत. म्हणून मास्क लावून चुंबन घेताना फार काळजी घेणे आवश्यक आहे”(Mask Kissing New trend in Corona Pandemic situation is it safe or not know the answer)

मास्कच्या बाह्यपृष्ठ भागावर अधिक विषाणू

मास्क काढणे आणि सार्वजनिकपणे चुंबन घेण्याचे दुष्परिणाम एका व्यक्तीस केवळ COVID-19 होण्यापलीकडे देखील जाऊ शकतात.

वैद्यकीय संचालक आणि मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटरच्या आयव्हीएफ स्पेशलिस्ट डॉ. शोभा गुप्ता यावर स्पष्टीकरण देताना म्हणतात, ” इतर लोकांच्या मास्कच्या बाह्य पृष्ठभागावर जास्तीत जास्त व्हायरस असल्याने हे खरोखर खूप धोकादायक आहे. मास्कचा जवळचा संपर्क अतिशय धोकादायक असू शकतो. म्हणूनच, थेट समोरासमोरचा संपर्क किंवा जवळचा संपर्क करणे टाळण्याचा सल्ला आम्ही देतो.”

मास्क लावून चुंबन नकोच!

मास्क घातलेले दोन लोक एकमेकांचे चुंबन घेत असल्यास कोणत्या प्रकारची समस्या उद्भवली आहे? या प्रश्नांचे उत्तर देताना त्या म्हणतात, “ही अद्याप एक प्रश्नार्थक गोष्ट आहे, कदाचित आपल्या नाकावरील संरक्षक थर अर्थात मास्क पुरेसा प्रभावी नसेल, तर व्हायरस सहजपणे एरोसॉल्सद्वारे संक्रमित होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येकाने सावधगिरी बाळगलीच पाहिजे आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क लावून चुंबन घेणे टाळले पाहिजे”.

(Mask Kissing New trend in Corona Pandemic situation is it safe or not know the answer)

हेही वाचा :

कोरोनावर मात केल्यानंतर सारखा थकवा येतोय? मग आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा !

Anti-Anxiety Foods : तणाव कमी करण्यासाठी आणि मनःस्थिती सुधारण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.