AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूचा कहर; मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात संशोधन सुरू

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा कहर निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या या नव्या विषाणूवर जगभर संशोधन सुरू करण्यात आले आहे. (mumbai's kasturba hospital will study new coronavirus strain)

ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूचा कहर; मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात संशोधन सुरू
अमेरिकन डिक्शनरी मेरियम-वेबस्टर (Merriam-Webstar) ने 'व्हॅक्सिन' (Vaccine) ला 'वर्ड ऑफ द इयर' 2021 म्हणून घोषित केले आहे. व्हॅक्सिन म्हणजे काय हे लहानपणापासूनच आपल्या सर्वांना माहीत आहे, पण गेल्या दोन वर्षांत जगाभरात हा शब्द जास्तीत जास्त वेळा वापरला गेला आहे.
| Updated on: Dec 23, 2020 | 10:30 AM
Share

मुंबई: ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचा कहर निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या या नव्या विषाणूवर जगभर संशोधन सुरू करण्यात आले आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातही आजपर्यंत घेतलेल्या कोरोनाच्या वेगवेगळ्या स्वबचा तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या या नव्या प्रजातीचा भारतात शिरकाव झाला की नाही याची माहिती मिळू शकणार आहे. (mumbai’s kasturba hospital will study new coronavirus strain)

ब्रिटनमद्ये काही दिवसांपासून नव्या कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजवला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला असून भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घातली आहे. तसेच भारतात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. या नव्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात संशोधन सुरू आहेत. मुंबईतही नव्या कोरोनाच्या अभ्यासासाठी कस्तुरबा रुग्णालय संग्रहित नमुन्यांची तपासणी करणार आहे. सप्टेंबर महिन्यांपासून संग्रहित करण्यात आलेल्या या नमुन्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.

नव्या कोरोना विषाणूचे निदान करण्यासाठी आपल्याकडे कोणतीही विशेष चाचणी उपलब्ध नाही. त्यामुळे सप्टेंबरपासून वेगवेगळ्या कालावधीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्या नमुन्यांचा नव्याने अभ्यास करण्यात येणार असल्याचं पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले. या जमा करण्यात आलेल्या नमुन्यांतील एस जेन या घटकाविषयी संशोधनात्मक पातळीवर अभ्यास करून पुढील निष्कर्षासाठी हे नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या संशोधनातून काय माहिती पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (mumbai’s kasturba hospital will study new coronavirus strain)

संबंधित बातम्या:

कोरोना स्ट्रेनला जग का घाबरतंय? आणि कोरोनाचं हे नवं रुप आहे तरी काय? सगळ्या प्रश्नांची सखोल उत्तरं!

नव्या कोरोना लसीचा धसका?, थांबा..! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला बघा, निर्णय घ्या!

कोरोनाच्या नव्या घातक प्रजातीवर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, युरोपीय देशांना विशेष सूचना

(mumbai’s kasturba hospital will study new coronavirus strain)

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.