Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्या मात्र 4 लाखांच्या वरच

गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 948 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 219 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 43 हजार 903 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, सक्रिय रुग्णसंख्या मात्र 4 लाखांच्या वरच
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 4 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 38 हजार 948 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 219 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना असल्यामुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वाढत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 948 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 219 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 43 हजार 903 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 30 लाख 27 हजार 621 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 21 लाख 81 हजार 995 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 40 हजार 752 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 4 हजार 874 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 68 कोटी 75 लाख 41 हजार 762 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 38,948

देशात 24 तासात डिस्चार्ज – 43,903

देशात 24 तासात मृत्यू – 219

एकूण रूग्ण – 3,30,27,621

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,21,81,995

एकूण मृत्यू – 4,40,752

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,04,874

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 68,75,41,762

गेल्या 24 तासातील लसीकरण – 

केरळात किती कोरोनाग्रस्त?

38 हजार 948 नवीन कोरोनाग्रस्तांपैकी एकट्या केरळमध्ये काल 26 हजार 701 रुग्ण सापडले, तर 219 कोरोना बळींपैकी केरळात 74 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भिती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI