Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, कोरोनाबळी मात्र पुन्हा 1200 पार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 10, 2021 | 9:58 AM

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 766 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1206 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 45 हजार 254 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, कोरोनाबळी मात्र पुन्हा 1200 पार
CORONA

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 1 हजाराने घट झाली आहे. कालच्या दिवसात 42 हजार 766 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1206 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाबळींचा आकडा पुन्हा वाढल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे, तर नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. (New 42766 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 42 हजार 766 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1206 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 45 हजार 254 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 7 लाख 95 हजार 716 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 99 लाख 33 हजार 538 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 7 हजार 145 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 55 हजार 33 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 36 कोटी 89 लाख 91 हजार 222 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 42,766

देशात 24 तासात डिस्चार्ज – 45,254

देशात 24 तासात मृत्यू – 1,206

एकूण रूग्ण – 3,07,95,716

एकूण डिस्चार्ज – 2,99,33,538

एकूण मृत्यू – 4,07,145

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 4,55,033

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 

संबंधित बातम्या :

कोरोना लसीच्या पहिला डोस ते दुसऱ्या डोस दरम्यानची गर्भधारणा किती सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..

लसीकरणानंतरचे साईड इफेक्ट्स दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

(New 42766 Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI