Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, मात्र सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा 3.44 लाखांपार

गेल्या 24 तासात भारतात 44 हजार 658 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 496 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 32 हजार 988 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, मात्र सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा 3.44 लाखांपार
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 9:46 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांत मिळून नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये तब्बल 21 हजारांची वाढ झाली असताना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 44 हजार 658 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 496 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 44 हजार 658 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 496 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 32 हजार 988 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 26 लाख 3 हजार 188 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 18 लाख 21 हजार 428 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 36 हजार 861 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 44 हजार 899 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 61 कोटी 22 लाख 8 हजार 542 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 44,658

देशात 24 तासात डिस्चार्ज – 32,988

देशात 24 तासात मृत्यू – 496

एकूण रूग्ण – 3,26,03,188

एकूण डिस्चार्ज – 3,18,21,428

एकूण मृत्यू – 4,36,861

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,44,899

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 61,22,08,542

गेल्या 24 तासातील लसीकरण – 83,62,067

संबंधित बातम्या :

भारतात झायडस कॅडिला लसीच्या वापरास मंजुरी, आपत्कालीन वापरास DCGI कडून मंजुरी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने धाकधूक, राज्यात एका दिवसात 216 कोरोनाबळी, मृत्यूदरातही वाढ

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.