Corona Cases In India | देशात नवे कोरोनाग्रस्त 60 हजारांच्या घरात, कोरोनाबळींतही 1200 ने घट

गेल्या 24 तासात भारतात 60 हजार 471 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 726 रुग्णांना प्राण गमवावे लागले.

Corona Cases In India | देशात नवे कोरोनाग्रस्त 60 हजारांच्या घरात, कोरोनाबळींतही 1200 ने घट
Corona
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 9:52 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 10 हजारांनी घट झाली आहेच, मात्र गेल्या 75 दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. कालच्या दिवसात 60 हजार 471 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 2 हजार 726 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे (New 60471 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 60 हजार 471 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 726 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 1 लाख 17 हजार 525 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 95 लाख 70 हजार 881 वर गेला आहे. देशात 2 कोटी 82 लाख 80 हजार 472 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 77 हजार 31 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 9 लाख 13 हजार 378 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 25 कोटी 90 लाख 44 हजार 72 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 60,471

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,17,525

देशात 24 तासात मृत्यू – 2726

एकूण रूग्ण –  2,95,70,881

एकूण डिस्चार्ज – 2,82,80,472

एकूण मृत्यू – 3,77,031

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 9,13,378

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 25,90,44,072

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लसीकरणाची नोंद

2 डोसमधील अंतर वाढवल्यास संसर्गाचा धोका अधिक, अमेरिकेच्या वैद्यकीय सल्लागारांचा दावा

Non Stop LIVE Update
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.