AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोविडच्या नव्या लाटेचे संकेत ! आशियातील ‘या’ देशांमध्ये कोविड-19 ने हाहाकार माजवला

कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हाँगकाँगमध्ये कोविड-19 ची प्रकरणे आणि मृत्यू हे वर्षभरातील उच्चांकी पातळीवर आहेत.

कोविडच्या नव्या लाटेचे संकेत ! आशियातील 'या' देशांमध्ये कोविड-19 ने हाहाकार माजवला
covid 19
| Edited By: | Updated on: May 17, 2025 | 2:56 PM
Share

जगातून कोरोनाचे उच्चाटन झाले आहे का? जगभरात हाहाकार माजवणारा कोविड-19 संपला, असं तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची चूक आहे. होय, पुन्हा एकदा कोरोना जगात हळूहळू पसरत आहे. हाँगकाँगपासून सिंगापूरपर्यंत कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. होय, कोव्हिड -19 ची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य अधिकारी चिंतेत पडले आहेत. कोव्हिड-19 च्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झाल्याने संपूर्ण आशियात कोविडच्या नव्या लाटेचे संकेत मिळाले आहेत.

वास्तविक, हाँगकाँगमधील कोरोना आता आपला खरा रंग दाखवत आहे. कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनमधील संसर्गजन्य रोग शाखेचे प्रमुख अल्बर्ट ऑ म्हणतात की, कोरोना व्हायरसची सक्रियता आता खूप उच्च पातळीवर पोहोचली आहे. कोविड-19 पॉझिटिव्ह नमुन्यांची टक्केवारी वर्षभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. म्हणजेच कोरोनाची प्रकरणं तर येत आहेतच, शिवाय मृत्यूही होत आहेत.

हाँगकाँगमध्ये कोविड प्रकरणे

हाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे आणि मृत्यू जवळपास वर्षभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. 3 मे च्या आठवड्याच्या शेवटी हाँगकाँगमध्ये कोरोनाव्हायरसमुळे 31 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांतील कोरोनाचा संसर्ग अद्याप शिगेला पोहोचलेला नाही. कोव्हिडसंबंधित रुग्णांसाठी डॉक्टरांकडे जाऊन रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 70 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

कोरोनाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांपासून ते विशेषांपर्यंत सर्वांना वेठीस धरायला सुरुवात केली आहे. हाँगकाँगचे गायक आयसन चॅन यांना कोविड-19 ची लागण झाली आहे. कॉन्सर्टच्या अधिकृत वीबो अकाऊंटवरील पोस्टनुसार, तैवानमधील काओशुंग येथे या आठवड्यात होणारी त्यांची कॉन्सर्ट रद्द करण्यात आली आहे.

सिंगापूरमध्येही कोरोनासंदर्भात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या महिन्यात आरोग्य मंत्रालयाने जवळपास वर्षभरात प्रथमच संसर्गाच्या आकडेवारीचे अपडेट जारी केले. 3 मे रोजी संपलेल्या वीकेंडमध्ये अंदाजित प्रकरणांमध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाचे 14,200 नवे रुग्ण आढळले आहेत. सिंगापूरमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असली तरी आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, जे नवीन व्हेरिएंट पसरत आहेत ते अधिक संसर्गजन्य आहेत किंवा पूर्वीपेक्षा अधिक गंभीर आजारास कारणीभूत आहेत असे अद्याप कोणतेही संकेत नाहीत.

कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चिंता का वाढली?

हिवाळ्यात श्वसनाचे विषाणू सहसा अधिक सक्रिय असतात. पण यंदा उन्हाळा सुरू होताच कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. उन्हाळ्यातही कोरोना व्हायरस वेगाने पसरू शकतो आणि मोठ्या संख्येने लोक आजारी पडू शकतात, हे स्पष्ट झाले आहे.

आशियातील इतर देशांचे काय?

चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या आकडेवारीनुसार चीनमध्येही कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या शिखरावर पोहोचलेल्या कोविड-19 लाटेचा ही चीनला अनुभव येणार आहे. चीनच्या रुग्णालयांमध्ये आता कोविड पॉझिटिव्हचे रुग्ण सापडत आहेत. तर थायलंडच्या रोग नियंत्रण विभागानेही कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात सध्या कोरोनाचे रुग्ण दिसत नाहीत. त्यामुळे आत्ता च इथे घाबरण्याची गरज नाही.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.