AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron Variant : ओमिक्रॉनची देशात एन्ट्री, जाणून घ्या काय आहेत लक्षणे आणि कोणती खबरदारी घेणे आवश्यक!

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सर्वांची चांगलीच धास्ती वाढवली आहे. कारण कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron Variant) 2 रूग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बुधवारी रात्री उशिरा देशात ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळून आले असून त्यांच्यावर आता उपचार देखील सुरू आहे.

Omicron Variant : ओमिक्रॉनची देशात एन्ट्री, जाणून घ्या काय आहेत लक्षणे आणि कोणती खबरदारी घेणे आवश्यक!
ओमिक्रॉन
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 1:16 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने सर्वांची चांगलीच धास्ती वाढवली आहे. कारण कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron Variant) 2 रूग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) म्हणण्यानुसार बुधवारी रात्री उशिरा देशात ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळून आले असून त्यांच्यावर आता उपचार देखील सुरू आहे. यामुळे ओमिक्रॉनची आता सर्वांनीच धास्ती घेतली आहे. ओमिक्रॉनची नेमकी कोणती लक्षणे आहेत, हे आपण बघणार आहोत.

ओमिक्रॉनच्या रुग्णामध्ये ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात

-सौम्य डोकेदुखी

-कोरडा खोकला

-संपूर्ण शरीरामध्ये वेदना

-घसा खवखवणे

-खूप थकवा

दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टरांना ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने स्नायू दुखणे, घसा खवखवणे, कोरडा खोकला आणि थकवा ही लक्षणे दिसून आली आहेत. मात्र, डॉक्टरानी असेही सांगितले आहे की, फक्त हीच लक्षण असली म्हणजे ओमिक्रॉन असावा असेही काही नाही. परंतू बहुतांश रूग्णांमध्ये ही लक्षणे आढळून आली आहेत.

ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी ही घ्या खबरदारी

1. WHO ने नुकताच ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी काही सूचना सांगितल्या आहेत. लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, इतर उत्सव वगैरे अशा ठिकाणी गर्दी करणे टाळा. तसेच आरोग्याची काळजी घेणे. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळाच.

2. WHOच्या दक्षिण-पूर्व आशिया संचालक डॉ पूनम खेत्रपाल सिंह म्हणाल्या की, आपण कोणत्याही किंमतीत ओमिक्रॉनकडे दुर्लक्ष करू नये. संसर्ग रोखण्यासाठी सर्वसमावेशक आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य सेवा आणि सामाजिक उपाययोजना सुरू ठेवाव्यात.

3. ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी मास्क देखील खूप महत्वाचे आहे. कारण कोरोना असताना आपण मास्क वापरत होतो. मात्र, कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी झाली आणि आपण मास्क वापरणे बंदच केले. मात्र आपल्याला जर ओमिक्रॉनपासून दूर राहिचे असेल तर मास्क वापरल्याशिवाय पर्याय नाही.

काही रूग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत!

व्हेरिएंट ओमिक्रॉनचा अजून पूर्णपणे अभ्यास करण्यात आलेला नाहीये. अनेक देशांमध्ये तज्ञ त्याचा अभ्यास करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) नुसार, B.1.1.1.529 प्रकाराच्या संसर्गानंतर आतापर्यंत कोणतीही असामान्य लक्षणे आढळलेली नाहीत. एनआयसीडीने असेही नोंदवले आहे की, ओमिक्रॉनच्या संक्रमितपैकी काही रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाहीयेत.

संबंधित बातम्या : 

Corona : ओमिक्रॉन व्हेरिएंट आला असतानाच मोठी बातमी, एकाच कॉलेजमधील 281 विद्यार्थ्यांना कोरोना

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.