पालकांनो, कोरोनापासून लहान मुलांना सांभाळा! सरकारची ही आहेत नवीन मार्गदर्शक तत्त्वे

लहान मुलांना कोरोनाचा चटकन संसर्ग होतो, त्यामुळे आपली मुले गर्दीच्या ठिकाणी जाणार नाहीत. त्यांचा इतरांशी संपर्क येणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. (Parents, take care of the little ones from Corona! These are the government's new guidelines)

पालकांनो, कोरोनापासून लहान मुलांना सांभाळा! सरकारची ही आहेत नवीन मार्गदर्शक तत्त्वे
पालकांनो, कोरोनापासून लहान मुलांना सांभाळा!

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचा धोका दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. विषाणूची दुसरी लाट अधिक भयंकर आहे. या लाटेत लहान मुलांमध्येही संसर्गाचे प्रमाण वाढते आहे. देशभरात दररोज 3 ते 4 लाखांच्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. अशात ज्या प्रमाणे वृद्ध लोकांची काळजी घ्यायला हवी, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पालकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून आपल्या बच्चे कंपनीचा कोरोना संसर्गापासून बचाव केला पाहिजे. लहान मुलांना कोरोनाचा चटकन संसर्ग होतो, त्यामुळे आपली मुले गर्दीच्या ठिकाणी जाणार नाहीत. त्यांचा इतरांशी संपर्क येणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. (Parents, take care of the little ones from Corona! These are the government’s new guidelines)

आरोग्य मंत्रालयाची ही आहेत मार्गदर्शक तत्त्वे

ज्या लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे, मात्र या संसर्गाची कुठलीही लक्षणे दिसून येत नाहीत, अशा मुलांसाठी कुठल्याही प्रकारच्या उपचारांचा सल्ला देण्यात आलेला नाही. मात्र मुलांमध्ये दिसणार्या संभाव्य लक्षणांवर बारीक लक्ष ठेवण्याचा सल्ला पालकांना देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वांची दोन कागदपत्रे जारी केली आहेत. यात एका कागदपत्रामध्ये मुलांच्या ‘होम आयसोलेशन’संबंधी रिव्हाईज्ड गाईडलाईन्सचा समावेश आहे, तर दुसर्या कागदपत्रामध्ये मुलांच्या उपचारासंबंधी मॅनेजमेंट प्रोटोकॉलचा अंतर्भाव केला आहे.

सौम्य संसर्गासाठी मार्गदर्शक तत्त्वे

1. गळ्यात खवखव, अधूनमधून खोकला यांसारखी सौम्य लक्षणे असतील, पण श्वासाच्या त्रासासारखी गंभीर लक्षणे नसतील, त्यावेळी मुलांना होम आयसोलेशनमध्येच ठेवा.

2. मुलांच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही, याची विशेष काळजी घ्या. मुलांना लिक्विड पदार्थ द्या.

3. जर मुलांना ताप येत असेल तर 10 ते 15 मिलीग्राम पॅरासिटामोल द्या.

4. जर काही धोकादायक लक्षणे दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा

मध्यम स्वरुपाची कोरोना लक्षणे

1. ज्या मुलांमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी आहे, मात्र न्युमोनियाची लक्षणे नाहीत, अशा मुलांचा या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

2. मध्यम लक्षणे असलेल्या मुलांना कोविड हेल्थ सेन्टरमध्ये दाखल केले जाऊ शकते.

3. मुलांना ताप येत असेल तर पॅरासिटामोल आणि बॅक्टिरियल इन्फेक्शन असेल तर एमोक्सिसिलिन देऊ शकता.

4. जर मुलांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी 94 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर मुलांना तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करायला हवा.

गंभीर लक्षणे असलेल्या मुलांची घ्यावयाची काळजी

1. मुलांमध्ये गंभीर निमोनिआ (न्यूमोनिया), रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस), मल्टी ऑर्गन डिसइन्फेक्शन सिंड्रोम (एमओडीएस) आणि सेप्टिक शॉक यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर ती गंभीर लक्षणे असतात.

2. या कॅटेगरीतील मुलांना तातडीने आयसीयू किंवा एचडीयूमध्ये दाखल करण्याची गरज आहे. या मुलांचे ब्लड काऊंट, लिव्हर, रिनल फंक्शन टेस्ट आणि चेस्ट एक्स रे करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाला देण्यात आला आहे. (Parents, take care of the little ones from Corona! These are the government’s new guidelines)

इतर बातम्या

CM Uddhav Thackeray speech highlights : 12 कोटी डोस एकरकमी घेतो, पण लस पुरवा : मुख्यमंत्री

CM Thackeray : ‘ऑक्सिजनच्या तुटवड्याची माहिती आली की एसीत घाम येतो’, मुख्यमंत्र्यांच्या संवादातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI