पतंजलीच्या आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले एक्सरसाईज, हात-पाय आणि मानेचं दुखणं दूर होणार

पतंजली यांच्याद्वारे आचार्य बालकृष्ण आणि योगगुरु बाबा रामदेव आयुर्वेदाचा प्रसार सर्वसामान्यांपर्यंत करण्यासाठी काम करीत आहेत. या लेखात आपण आचार्य बालकृष्णद्वारा दिलेल्या काही सोपी योगासनं किंवा एक्सरसाईज संदर्भात माहीती घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या हात, पाय आणि मानेचं दुखणं बरं होण्यास मदत होणार आहे.

पतंजलीच्या आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले एक्सरसाईज, हात-पाय आणि मानेचं दुखणं दूर होणार
| Updated on: Jun 25, 2025 | 10:32 PM

पतंजलीचे आचार्य रामदेव यांनी त्यांच्या उत्पादनाद्वारे आयुर्वेद आणि स्वदेशीला प्रमोट केले आहे. याशिवाय त्यांनी योगासोबतच आयुर्वेदिक औषधं आणि निरोगी जीवनशैली संदर्भात पुस्तके लिहीली आहेत. त्यांनी लिहीलेल्या ‘Yog its Philosophy and Practice’ या पुस्तकात योगासन,वेगवेगळ्या मुद्रा, त्यांना करण्याच्या पद्धती आणि नियम दिलेले आहेत. पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांचे हे पुस्तक प्राचीन भारतीय एक्युप्रेशर तंत्र आणि शरीरावरील त्याचा परिणाम याची माहीती दिली आहे. या पुस्तकात आचार्य बालकृष्ण यांनी लाईट एक्सरसाईजची माहीती दिली आहे. ज्यामुळे तुमच्या दैनंदिन आरोग्याच्या समस्या हातपाय, खांदे आणि मान दुखणे यापासून सुटका होणार आहे.

स्वामी रामदेव यांच्या या पुस्तकात पायदुखी पासून वाचण्याचे आसनं सांगितली आहेत. दंडासनात बसुन ते केले जातात. चटईवर बसणे आणि पायांना समोरच्या बाजूला पसरवणे तसेच दोन्ही हातांच्या तळव्यांना जमीनीवर ठेवून आरामात बसावे.येथे बालकृष्ण यांच्या फोटोतील मुद्रा आपण ध्यानात घेऊन हे आसन करावे,चला तर इतर योगासनांची माहीती घेऊयात..

दंडासनात बसण्याची पद्धत


पायांची बोटे दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी

पायांची बोटे जखडली असतील आणि दुखत असती तर हे सोपे एक्सरसाईज चांगलीच परिणामकारक आहे.दंडासनात बसुन टाचांना सरळ ठेवावे आणि पायाच्या बोटांना जोडावे. यानंतर हळूहळू संपूर्ण ताकदीने बोटांना पुढे ढकलावे नंतर पुन्हा मागे ढकलावे. या पद्धतीने आठ ते दहा वेळा करावे.

टाचा आणि तळव्यांच्या दुखण्यातून सुटका

टाचा आणि पायांच्या तळव्यांना दुखण्यापासून वाचवण्यासाठी सर्वात आधी दोन्ही पायांना परस्परांना जोडून एक साथ ठेवावे आणि दोन्ही पायांना हळूहळू पुढे आणि मग मागे करावे. ही प्रक्रीया दुसऱ्यांदा करावी, पायांना पुढे झुकवावे आणि पुन्हा मागे घ्यावे.

पायांचा तळव्यांना दुखण्यापासून दूर करण्याचा एक्सरसाईज

घोट्याचा दुखण्यापासून वाचण्यासाठी एक्सरसाईज

घोट्यांना मजबूत राखण्यासाठी आणि त्यांची हालचाल योग्य राखण्यासाठी दुखणे आणि स्नायूंचा स्टीफनेसपासून सुटका करण्यासाठी आपल्या पायांना दंडासनात बसून सरळ ठेवावे आणि यास सर्क्युलर मोशनमध्ये फिरवावे. परंतू टाचेला एकाच जागी ठेवावे, पाय वर्तुळाकार फिरवावा. आळीपाळीने दोन्ही पायांनी ही प्रॅक्टीस 5 ते 7 वेळा करावी. यामुळे पोटऱ्यांचं दुखणंही बरे होते.


घोट्याच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी पायांना रोटेट करावे

गुडघा – नितंबाच्या दुखण्यापासून सुटका

गुडघा आणि नितंबांना मजबूत बनविण्यासाठी या जागांना हाडे आणि स्नायूंना दुखण्यापासून सुटका मिळवायची असेल गुडघे पतंजलीच्या आचार्यांनी काही सिम्पल गुपिते सांगितली. यात आपल्या उजव्या पायाला फोल्ड करुन डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावे. यानंचर आपला सरळ हात सपोर्टसाठी गुडघ्यावर ठेवावा. आणि आपल्या गुडघ्याला हाताने उचलून छातीपर्यंत न्यावे. दुसरीकडे मांडीवर ठेवलेल्या पायाला सपोर्टसाठी पकडावे. येथे दिलेल्या फोटोत पाहावे.

गुडघे आणि कंबरेसाठी व्यायाम

मानदुखीपासून सुटकेसाठी –

रामदेव बाबा यांनी या पुस्तकात मानदुखीपासून सुटका मिळविण्यासाठी लाईट एक्सरसाईज करण्याचा सल्ला दिला आहे. बैठा जॉब करणाऱ्यांना ही लाईट एक्सरसाईज करायला हवी. कारण एका जागी 8-9 तास बसल्यानंतर काम केल्याने मानेत खुप दुखू लागते. या आसनात सरळ बसल्यानंतर मानेला आधी पुढे झुकवावे. आणि नंतर पाठी घ्यावे. त्यानंतर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला मान झुकवावी. यानंतर मान हळूहळू रोटेट करावी म्हणजेच मान फिरवावी.

Neck Pain

मानदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काय करावे?

खांदेदुखी टाळण्यासाठी व्यायाम

ज्या लोकांना बसून काम करावे लागते आणि खांद्यावर जड बॅग वाहून नेतात त्यांना खांदेदुखीची समस्या असते, तर काही लोकांच्या खांद्यांना स्नायूंमध्ये कडकपणा आल्याने वेदना होऊ लागतात. आचार्य बाळकृष्ण यांनी यासाठी एक हलका व्यायाम सुचवला आहे. यामध्ये, तुम्हाला तुमचे दोन्ही हात खांद्यावर ठेवावे लागतील, ज्यामुळे कोपर वाकतील आणि नंतर तुमचे हात (कोपर) वरच्या दिशेने घेऊन फिरवावे लागतील.

Shoulder Pain Relief Light Exercises

पतंजली ब्रँड लाँच करण्याचे उद्दिष्ट योग आणि ध्यानाद्वारे लोकांना निरोगी जीवन प्रदान करणे तसेच स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि लोकांमध्ये आयुर्वेदाचे महत्त्व पसरवणे आहे.