‘या’ लोकांनी चुकूनही पिऊ नये नारळ पाणी, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
नारळ पाण्यात असलेले पोषक घटक आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात, विशेषतः उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत करते. मात्र काही वैद्यकीय परिस्थितींमध्ये नारळ पाणी पिणे टाळले पाहिजे. चला तज्ञांकडून याबद्दल जाणून घेऊयात.

नारळपाणी हे आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी मानले जात नाही. कारण यात असलेले पोषक तत्व वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात, विशेषतः उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे अधिक फायदेशीर मानले जाते कारण त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. ते आपल्या एकूण आरोग्यासाठी चांगले आहे. बहुतेक लोकांना सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायला आवडते. तर काहीजण हे दररोज नारळ पाण्याचे सेवन करतात.
नारळाच्या पाण्यात असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर 240 मिली नारळाच्या पाण्यात 60 कॅलरीज 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, 8 ग्रॅम साखर, दैनिक मूल्यानुसार 4% कॅल्शियम, दैनिक मूल्यानुसार 4% मॅग्नेशियम, 2% फॉस्फरस आणि 5% पोटॅशियम असते. नारळाच्या पाण्यातील पोषक तत्वे देखील नारळाच्या पाण्याच्या वजनावर अवलंबून असतात.
दररोज मर्यादित प्रमाणात नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्ही जर कोणत्या आजारांने ग्रस्त असाल तर त्यात तुम्ही चुकूनही नारळपाणी पिऊ नये. कारण अशा परिस्थितीत नारळपाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान देखील होऊ शकते. पोषणतज्ञ श्वेता शाह यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की कोणत्या लोकांनी नारळ पाणी पिऊ नये. चला तर मग जाणून घेऊयात.
नारळ पाणी कोणी पिऊ नये?
कमी रक्तदाब
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्या लोकांना कमी रक्तदाब आहे त्यांनी नारळ पाणी अजिबात पिऊ नये. त्यातच जर एखाद्या व्यक्तीचे रक्तदाब आधीच 110/70 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर अशात नारळ पाणी प्यायल्यास तुमचा रक्तदाब आणखी कमी होऊ शकतो.
खराब पचन किंवा आयबीएस
ज्या लोकांची पचनक्रिया आधीच कमकुवत आहे किंवा जर कोणाला आयबीएसची समस्या असेल तर त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. कारण अशा परिस्थितीत नारळ पाणी प्यायल्यानंतर त्यांना गॅस आणि पोट फुगणे यासारख्या पचनाशी संबंधित समस्या जाणवू शकतात.
सर्दी आणि खोकला होण्याचा धोका
नारळाच्या पाण्याचा थंड प्रभाव असतो हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे सर्दी, खोकला आणि सायनसची समस्या वाढू शकते. त्यामुळे सर्दी आणि खोकल्याची समस्या असल्यास दरम्यान नारळाचे पाणी पिऊ नये.
मधुमेहाची समस्या
मधुमेह असलेल्या लोकांसाठीही दिवसातून फक्त एकदा नारळ पाणी पुरेसे आहे. कारण त्यात नैसर्गिक साखर असते, म्हणून ते कमी प्रमाणात प्या. जर साखरेचे प्रमाण खूप जास्त असेल तर ते पिणे टाळा.
येथे पाहा व्हिडीओ –
View this post on Instagram
नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
ज्यांना नारळ पाणी पिण्याची आवड आहे त्यांनी सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान ते पिणे चांगले. संध्याकाळी नारळ पाणी पिणे टाळा, याशिवाय, प्रत्येकाने मर्यादित प्रमाणात आणि हवामानानुसार नारळ पाणी प्यावे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
