Diabetes : पाळीव प्राण्यांनाही होऊ शकतो डायबिटीस, तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय !

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पाळीव प्राणी घरी ठेवणाऱ्या लोकांनी जास्त काळजी घेणे आणि सावधान राहणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी घरातील प्राण्यांना मिठाई किंवा गोड पदार्थ खायला देऊ नयेत.

Diabetes : पाळीव प्राण्यांनाही होऊ शकतो डायबिटीस, तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय !
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 10:11 AM

मुंबईः तो 9 महिन्यांचा होता, जेव्हा त्याला पहिल्यांदा एपिलेप्सीचा (epilepsy) झटका आला. त्याच्या शरीरात विचित्र हालचाली होत होत्या. त्याच्या शरीरात 45 मिनिटांहून अधिक काळ पेटके येत असल्यामुळे कुटुंबातील लोकही चिंतित झाले होते. पण त्यांना वाटले की हे असे एकदाच झाले आहे, परत असा त्रास होणार नाही. पण तसे नव्हते. त्यानंतर अवघ्या 6 आठवड्यांमध्ये रोमिओ, या लॅब्रॅडॉरला परत असाच त्रास झाला. मात्र त्यावेळी त्याला खूप त्रास झाला आणि तेव्हाच त्याच्या एपिलेप्सीचे निदान झाले. दिल्लीतील विख्यात पशुतज्ज्ञ, डॉ. अनिल सूद यांनी Tv 9 ला सांगितले की, केवळ एपिलेप्सी हाच एक आजार नव्हे जो प्राण्यांना (Pet Animals) होऊ शकतो. त्यांना इतरही आजार अथवा त्रास होऊ शकतात.

डॉ. सूद यांच्या सांगण्यानुसार, पाळीव प्राण्यांनाही डायबिटीस म्हणजेच मधुमेह (Diabetes) होऊ शकतो. या आजाराची त्यांच्यामध्ये दिसणारी लक्षणे माणसांच्या लक्षणासारखीच असतात. उदा- सतत लघवी लागणे आणि जास्त पाणी पिणे. पण ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत, ते अशी लक्षणे क्वचितच नोटीस करतात. पाळीव प्राण्यांना टाइप I आणि टाइप II, असा दोन्ही प्रकारचा मधुमेह होऊ शकतो.

याचाच अर्थ , ज्यांच्या घरात पाळीव प्राणी आहेत, त्या लोकांनी जास्त काळजी घेणे आणि सावधान राहणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी घरातील प्राण्यांना मिठाई किंवा गोड पदार्थ खायला देऊ नयेत. याव्यतिरिक्त ‘ एखाद्या प्राण्याला जेव्हा मधुमेह होतो, तेव्हा त्याचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते ‘, असे डॉ. सूद यांनी सांगितले. ‘ बहुतांश वेळी जेव्हा एखादा पाळीव प्राणी अशा परिस्थितीत आमच्याकडे येतो, तेव्हा त्याची शुगर लेव्हल खूप वाढलेली – 800 mg/dl असू शकते. बहुतांश वेळेस ती 400-600 mg/dl लेव्हलपर्यंत असते, ‘ असेही डॉ. सूद यांनी नमूद केले.

पाळीव प्राण्यांची नियमित तपासणी करणे खूप महत्वाचे –

याच कारणामुळे पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बहुतेक पाळीव प्राण्यांना तीन महिन्यांतून एकदा चाचणी करण्यास सांगितले जाते. डॉ. सूद यांनी सांगितले की, पाळीव प्राण्यांचे केवळ लसीकरण करणे किंवा त्यांना कृमीनाशक गोळ्या देणे पुरेसे नाही. जवळजवळ सर्व पशु चिकित्सक कोणत्याही लक्षणांची तपासणी करण्यासाठी शारीरिक चाचण्या करतात. त्यामध्येच पाळीव प्राण्याला मोतीबिंदू झाला असल्यास किंवा त्यांच्या हृदयाचा आकार वाढला असल्यास, त्याची माहिती कळते.

स्प्लेनोमेगाली और हेपेटोमेगाली होणेही पाळीव प्राण्यांमध्ये सामान्य आहे –

माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांमध्येही वाढलेली प्लीहा (स्प्लेनोमेगाली) आणि विस्तारित यकृत (हेपेटोमेगाली) ही समस्या आढळू शकते. डॉ. सूद यांनी सांगितले की, जेव्हा या समस्या उद्भवतात तेव्हा पाळीव प्राण्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. पाळीव प्राणी हेपेटायटिस सारख्या अनेक संसर्गजन्य आजारांनी ग्रस्त होऊ शकतात. मात्र लसीकरणाद्वारे त्यांना त्या आजारापासून वाचवणे शक्य होते. चांगली गोष्ट अशी आहे की काही अनिवार्य लशी अशा आहेत, ज्या सर्व पाळीव प्राण्यांना दिल्याच पाहिजेत. त्यापैकी एक लस हेपेटायटिस पासून बचाव करण्यासाठीची आहे, असेही डॉ. सूद यांनी नमूद केले.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.