तुमच्या स्किन टोननुसार पावसाळ्यात त्वचेची घ्या काळजी, तज्ञांनी सांगितले ‘हे’ खास उपाय
पावसाळ्यात तुम्हाला आरोग्य आणि त्वचेशी संबंधीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागु शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन टोन नुसार तज्ञांनी सांगितलेल्या या खास टिप्सचा अवलंब करून त्वचेची काळजी घेऊ शकतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात...

पावसाळा सुरू झाला की वातावरणात गारवा निर्माण होत असतो, त्यामुळे उष्णतेपासून आराम मिळतो. तसेच पावसाळा हा ऋतू खूप आल्हाददायक वाटतो. पण पावसाळ्यात वातावरण जरी आल्हाददायक असलं तरी या दिवसांमध्ये प्रत्येकाला आरोग्य आणि त्वचेशी संबंधित सामान्य समस्या होत असतात. तर या दिवसांमध्ये त्वचेचा संसर्ग, ॲलर्जी आणि असमान त्वचेचा रंग यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची आणि आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते.
पावसाळ्यात हवामानात आर्द्रता असल्या कारणाने आपल्या चेहऱ्यावर तेलाचे उत्पादन देखील वाढते. यामुळे छिद्रे बंद होतात. यामुळे त्वचेवर मुरुम व पुरळ येतात. त्याच वेळी काही लोकांची त्वचा खूप कोरडी होते. म्हणून, तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर रूटींग अवलंबली पाहिजे. वातावरण, बदलते हवामान आणि खाण्याच्या सवयींचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. या समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी पावसाळ्यात त्वचेची काळजी घेताना तज्ञांनी दिलेल्या या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमची त्वचा चमकदार बनवू शकता.
तज्ञांनी सांगितले हे खास टिप्स
दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ सल्लागार, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल म्हणतात की पावसाळ्यात त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण या दिवसांमध्ये ओलावा आणि धुळीमुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर या ऋतूत घाम आणि जास्त तेल निर्मितीमुळे चेहऱ्यावर मुरुमे आणि ब्लॅकहेड्स येऊ शकतात. यासाठी या ऋतूत सौम्य आणि तेलमुक्त फेसवॉश वापर करा आणि दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करा.
ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी निश्चितपणे हायलुरोनिक अॅसिड किंवा ग्लिसरीन असलेले मॉइश्चरायझर लावावे जेणेकरून ते त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करेल.
ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी हार्श केमिकलयुक्त असलेले प्रोडक्ट वापरणे टाळा कारण पावसाळ्यात त्वचा अधिक संवेदनशील होते.
पावसाळ्यात त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो, म्हणून आंघोळ केल्यानंतर त्वचा पूर्णपणे कोरडी करा. कोमट पाण्याने आंघोळ करा आणि खूप गरम पाणी टाळा कारण त्यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. तसेच भरपूर पाणी प्या जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.
पावसाळ्यातही सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे कारण या काळात त्वचा अतिनील किरणांच्या संपर्कात येते आणि त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवू शकता. परंतु योग्य काळजी घेतल्यानंतरही, जर तुम्हाला लालसरपणा, जळजळ, पुरळ, खाज सुटणे, सूज येणे, त्वचेच्या रंगात बदल आणि कोरडेपणा यासारख्या त्वचेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर तुम्ही त्याबद्दल तज्ञांचा सल्ला घ्यावा. ते तुम्हाला तुमच्या गरजेनुसार योग्य त्वचेची काळजी आणि प्रोडक्टबद्दल सांगू शकतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
