AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फार्म हाऊसमध्ये रात्रीस खेळ चाले! बाहेर महागड्या गाड्या तर आता जोड्या, तेव्हा अचानक….

Farmhouse Rave Party : पोलिसांनी रविवारी रात्री एका फार्म हाऊसवर छापा मारला. तेव्हा त्यांना बाहेर आलिशान चारचाकी उभ्या दिसल्या. तर आत जी शंका त्यांना वाटत होती, ती खरी ठरली. पोलिसांनी छापा मारताच येथे एकच खळबळ उडाली.

फार्म हाऊसमध्ये रात्रीस खेळ चाले! बाहेर महागड्या गाड्या तर आता जोड्या, तेव्हा अचानक....
Farm House
| Updated on: Jul 12, 2025 | 2:11 PM
Share

एका फार्म हाऊसवर काही तरी सुरू असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. मग पोलिसांनी रात्री मोठी कारवाई केली. पोलीस पोहचले त्यावेळी, फार्म हाऊस समोर अनेक महागड्या गाड्यांची रांगच लागली होती. पोलिसांनी आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या ठिकाणी पोलिसांनी आक्षेपार्ह साहित्य, वस्तू जप्त केल्या. याठिकाणी 18 मुलं आणि 10 मुली आल्या होत्या. त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या घरच्यांना हा प्रकार कळवला.

फार्महाऊसवर पोलिसांचा छापा

उदयपूरमध्ये पोलिसांनी एका फार्म हाऊसवर छापा टाकला. तेव्हा आता रेव्ह पार्टी आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली. गोगुंदा या परिसरातील हे दोन फार्म हाऊस अनेक दिवसांपासून बंद होते. पण अचानक येथे लोकांची ये जा वाढली होती. एका फार्म हाऊसमध्ये रेव्ह पार्टी तर दुसरीकडे वेश्या व्यवसाय सुरू होता. खबऱ्यांनी याविषयीची पक्की माहिती पोलिसांना दिली होती.

पोलिसांकडे वाढल्या होत्या तक्रारी

उदयपूर आणि आसपासच्या परिसरात अंमली पदार्थ आणि वेश्या व्यवसाय होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यातच फार्म हाऊस हे पोलिसांच्या रडारवर होते. काही फार्म हाऊसवर असे प्रकार होत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांचे नेटवर्क सक्रिय केले होते. माहिती मिळताच रविवारी रात्री पोलिसांनी या दोन फार्म हाऊसवर छापे टाकले. तेव्हा एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी पकडलेल्या सर्व मुली या राजस्थानमधील नाही तर बाहेरील राज्यातील असल्याचे तपासात पुढे आले.

माताजी खेडा या परिसरातील पियाकल प्रियंका पीपी फार्म हाऊस आणि खुमानपुरा येथील द स्काई हॉलीडे फार्म हाऊसवर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांनी येथे एका परदेशी नागरिकाला पण अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 3,20,000 रुपये मुल्यांचे डॉलर जप्त केले. पकडलेल्या सर्व मुली या राजस्थानमधील नाही तर बाहेरील राज्यातील असल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या या परिसरात खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी जी मुलं सापडली आहेत. त्यांच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनला बोलवल्याची माहिती समोर येत आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.