झोप पूर्ण होत नाहीये, चिडचिडेपणा वाढलाय?, चांगल्या झोपेसाठी फॉलो करा या टीप्स

अनेकांना झोपेची (Sleep) समस्या असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे इतरही अनेक समस्या निर्माण होतात. झोप पूर्ण न झाल्यामुळे माणूस चिडचिडेपणा करतो. मानसिक दृष्या (Mental Health) स्वस्थ राहण्यासाठी पुरेशाप्रमाणात झोप आवश्यक असते. रात्री व्यवस्थित झोप झाल्यास तुमचा दिवस चांगला जातो.

झोप पूर्ण होत नाहीये, चिडचिडेपणा वाढलाय?, चांगल्या झोपेसाठी फॉलो करा या टीप्स
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 6:47 PM

अनेकांना झोपेची (Sleep) समस्या असते. झोप पूर्ण न झाल्यामुळे इतरही अनेक समस्या निर्माण होतात. झोप पूर्ण न झाल्यामुळे माणूस चिडचिडेपणा करतो. मानसिक दृष्या (Mental Health) स्वस्थ राहण्यासाठी पुरेशाप्रमाणात झोप आवश्यक असते. रात्री व्यवस्थित झोप झाल्यास तुमचा दिवस चांगला जातो. चांगली झोप लागण्यासाठी काय करावे. (Sleep Hygiene Tips) काय काळजी घ्यावी? जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागेल, व तुमची झोप देखील पूर्ण होईल. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चांगली झोप झाल्यास तुमचा दिवस चांगला जातो. तसेच दिवसभर उत्साह टिकून असल्यामुळे तुमच्या कामाचा वेग देखील चांगला असतो. या उलट जर तुमची झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर तुमच्या अंगात आळस राहातो. त्याचा परिणाम तुमच्या कामावर देखील होतो. त्यामुळे चांगली झोप होणे हे महत्त्वाचे असते.

झोपेचा टाईम ठरवून घ्या

चांगल्या झोपेसाठी टायमिंग महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या झोपेचा टायमिंग ठरवून घ्या. काहीही झाले तरी त्याच वेळेत तुम्ही झोप घ्या. टायमिंग चुकवू नका. असे केल्यास तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी मदत होईल. तसेच झोपण्यापूर्वी एखादे चांगले गाणे किंवा पुस्तक वाचायची सवय लावा यामुळे देखील तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल. झोपण्यापूर्वी तुम्ही गरम तेलाने तुमच्या डोक्याची मॉलीश देखील करू शकता. मॉलीश केल्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होईल.

आरोग्यदायी ड्रिंग्सचे सेवन करा

तुम्ही दिवसभर काम करून थकता. अनेकदा तुमची मनस्थिती चांगली नसल्यामुळे तुम्हाला चांगली झोप येत नाही. तसेच अति थकव्यामुळे देखील कधीकधी झोप अपूर्ण राहाते. अशा स्थितीमध्ये तुम्ही काही प्रणाण ड्रिंग्सचे सेवन करू शकता. मात्र लक्षात ठेवा की बाजारात मिळणारे ड्रिग्स प्राधान्याने टाळा, घरगुती पेय जसे की लिंबू पानी यासारख्या ड्रिंग्सचा तुम्ही उपयोग करू शकता. झोपण्यापूर्वी कधीही कॉफी किंवा चहा सारख्या उत्तेजक पेयांचे सेवन करू नका. चहा, कॉफीमध्ये असे अनेक घटक असतात की ज्यामुळे झोप नाहीशी होते.

झोपताना फोन बंद करून झोपा

झोपताना तुम्ही फोन बंद करून झोपा. कारण अनेकवेळा कोणाचा कॉल, किंवा मॅसेज येतो. अशा कॉलमुळे तुमची झोप डिस्टप होऊ शकते. तुम्ही झोपलेले आहात आणि कोणाचा अचानक कॉल आला तर तुमची झोपमोड होते. मध्येच झोपमोड झाल्याने झोप अपूर्ण राहाते. त्यामुळे झोपताना नेहमी फोन बंद करूनच झोपा.

संबंधित बातम्या

रात्री झोपण्यापूर्वी आवश्य करा नारळाचे सेवन, ‘या’ समस्यांपासून मिळेल कायमचा सुटकारा

मुलांमुळे सतत चिडचिड होतेय? सारखं त्यांच्यावर रागवता का? वाचा, ओव्हर पॅरेंटिंग कसं घातक ठरू शकतं? 

अनेकांना अचानक बेचैन का वाटतं, काय होतो नेमका त्रास, घ्या जाणून…!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.