AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sleep Disorder: कोरोनानंतर अनेकांना जाणवतेय अनिद्रेची समस्या, तज्ज्ञांनी सुचविले उपाय

कोरोनंतर (Post Corona) अनेकांना झोपेची समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे.  नीट झोप न लागल्यामुळे किंवा अति झोप लागत असल्याने थकवा, डोकेदुखी आणि अशक्तपणाची समस्या उद्भवते.

Sleep Disorder: कोरोनानंतर अनेकांना जाणवतेय अनिद्रेची समस्या, तज्ज्ञांनी सुचविले उपाय
अनिद्रा Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 07, 2022 | 9:40 PM
Share

असे म्हणतात की निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्याचप्रमाणे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारासोबतच 7 ते 8 तासांची पूर्ण झोप देखील आवश्यक आहे. जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल किंवा अति झोप येत असेल, तर ही समस्या म्हणजे झोपेचा विकार मानली जाते. झोपेचा विकार (Sleep Disorder) एखाद्या व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे हानी पोहोचवण्यासाठी पुरेसा आहे. कोरोनंतर (Post Corona) अनेकांना झोपेची समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे.  नीट झोप न लागल्यामुळे किंवा अति झोप लागत असल्याने थकवा, डोकेदुखी आणि अशक्तपणाची समस्या उद्भवते. न्यूरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाच्या मते, स्लीप रिलेटेड डिसऑर्डर (SRD) सारख्या आजारांमागे माहितीचा अभाव असल्याचे सांगितल्या गेले आहे.

झोपेच्या विकाराची कारणे कोणती?

झोप न येण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की तणाव, चिंता आणि नैराश्य. यापैकी कोणत्याही एका समस्येमुळे झोप येत नाही, ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या शरीरावर आणि मनावर होतो. कधीकधी ही समस्या इतकी गंभीर होते की झोपेत बोलणे, अधिक स्वप्ने पाहणे आणि झोपेत चालणे देखील सुरू होते. याशिवाय काहींना गरजेपेक्षा जास्त झोप येणे, उत्साह न वाटणे, लहान लहान कामाने थकवा जाणवणे अशा समस्या पाहायला मिळतात.

  1.  सांधेदुखीसारख्या दीर्घकालीन वेदनांमुळे अचानक झोप उघडते आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करूनही झोप येत नाही.
  2.  शरीरात होत असलेल्या हार्मोनल असंतुलनामुळे कधीकधी झोप येत नाही.
  3.  श्वसनाच्या कोणत्याही आजारामुळे झोप येत नाही.
  4.  रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जाण्यामुळे देखील झोपेचा खोळंबा होतो.

महत्वाच्या टिप्स

  1. झोपण्यापूर्वी नियमित कोमट दूध पिण्याची सवय लावावी.
  2.  आहारात हिरव्या भाज्या, मसूर, भाकरी, भात आणि कोशिंबीर यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा अवश्य समावेश करावा.
  3.  आठवड्यातून किमान 4 ते 5 दिवस पायांना मसाज करा. त्यामुळे फायदा होतो आणि झोपही चांगली लागते.
  4.  चांगल्या झोपेसाठी सकाळची सुरुवात योगा किंवा जिमने करा. यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा राहील.
  5.  रात्री झोपण्यापूर्वी आणि रात्रीच्या जेवणानंतर शतपावलीने  देखील चांगली झोप येण्यास मदत होते.
  6.  धूम्रपान आणि मादक पदार्थ पूर्णपणे टाळावेत.
  7.  चहा किंवा कॉफीचे सेवन दिवसभरात दोनदाच करावे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.