Heart Attack Sign: महिनाभर आधीच मिळतात हार्ट ॲटॅकचे संकेत, ही लक्षणे तुम्हालाही जाणवलीत का ?

हृदयविकाराचा झटका अथवा हार्ट ॲटॅक येण्यापूर्वी आपल्या शरीरात अनेक लक्षणं दिसून येतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातूनही ही बाब समोर आली आहे.

Heart Attack Sign: महिनाभर आधीच मिळतात हार्ट ॲटॅकचे संकेत, ही लक्षणे तुम्हालाही जाणवलीत का ?
किक्रेट खेळत असताना हार्ट अटॅकने तरुणाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 10:20 AM

नवी दिल्ली – हार्ट ॲटॅक किंवा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) यामुळे आजच्या काळात अनेकांचा मृत्यू होताना दिसतो. हार्ट ॲटॅक ही एक अचानक घडणारी घटना असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. मात्र खरंतर असं नाही. हार्ट ॲटॅक एकदम अचानक येत नाही. त्याची काही लक्षणे (symptoms in body)शरीरात बराच काळ आधीपासून दिसायला लागतात, मात्र लोका त्याकडे लक्ष देत नाहीत. नुकताच 500 हून अधिक महिलांवर एक अभ्यास (study) करण्यात आला असून त्यातून जाहीर झालेल्या माहितीनुसार, हार्ट ॲटॅक येण्याच्या 1 महिना आधी शरीराकडून संकेत अथवा सूचना मिळण्यास सुरूवात होते.

जर्नल सर्क्युलेशनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, हार्ट ॲटॅक येण्यापूर्वी 1 महिना आधीच त्याची लक्षणे दिसू लागतात. या संशोधनात हृदयविकाराच्या झटक्यातून बचावलेल्या 500 हून अधिक महिलांचा समावेश होता. संशोधनात सहभागीं झालेल्यांपैकी 95 टक्के लोकांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटका येण्याच्या एक महिना आधीपासून शरीरात काही लक्षणे दिसून येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 71 टक्के लोकांनी त्यांना थकवा हे सामान्य लक्षण जाणवल्याचे सांगितले, तर 48 टक्के लोकांनी त्यांना झोपेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागल्याचे नमूद केले. तर काही महिलांनी त्यांना छातीत दुखणे, छातीवर दाब पडल्यासारखे वाटणे, वेदना किंवा घट्टपणा जाणवल्याची नोंद या संशोधनादरम्यान केली.

हे सुद्धा वाचा

हार्ट ॲटॅकची लक्षणे

– थकवा – झोप येण्यात अडचण निर्माण होणे / नीट झोप न लागणे – आंबट ढेकर येणे – चिंता – हृदयाचे ठोके वाढणे / ठोक्यांचा वेग वाढणे – हात जड होणे किंवा हातातील ताकद गेल्यासारख वाटणे – विस्मरण, स्मृतीत बदल होणे – भूक कमी लागणे – हाता-पायाला मुंग्या येणे – रात्री श्वास घेण्यास त्रास होणे.

ही आहेत हार्ट ॲटॅकची कारणे

– जाडेपणा / लठ्ठपणा – मधुमेह – हाय कोलेस्ट्रॉल – हाय ब्लड प्रेशर – धूम्रपान अथवा मद्याचे अतिरिक्त सेवन – हाय फॅट डाएट

हार्ट ॲटॅकपासून बचाव महत्त्वाचा

आपले हृदय सुरक्षित ठेवायचे असेल आणि हार्ट ॲटॅकचा धोका टाळायचा असेल तर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जीवनशैलीत योग्य ते बदल केले पाहिजेत. पौष्टिक व निरोगी असा संतुलित आहार घेणे, प्रक्रिया केलेले, साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करणे, नियमितपणे व्यायाम करणे हे महत्वाचे ठरते. तसेच वजनावर नियंत्रण ठेवा, वजन वाढल्यास कमी करण्याचा प्रयत्न करावा, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवा. मद्यपान व धूम्रपान हे आपल्या शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे, त्यामुळे ते टाळावे.

(टीप- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.