‘Work from home’मुळे शरीराला जडपणा आलाय? ‘ही’ तीन आसनं आजपासूनच सुरू करा…

Work from home : सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे मांसपेशींमध्ये जडपणाची समस्या निर्माण होत असते. यामुळे अनेकदा मान, पाठ, खांदे, कंबर आदींमध्ये दुखायला लागते. त्यामुळे याचा परिणाम आपल्या कामावरदेखील होत असतो.

‘Work from home’मुळे शरीराला जडपणा आलाय? ‘ही’ तीन आसनं आजपासूनच सुरू करा...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 12:23 PM

Work from home : कोरोना काळापासून अनेकांना कार्यालयात येण्याऐवजी घरूनच काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी ‘वर्क फ्रॉम होम’ आता आपल्या कामाच्या संस्कृतीचाच एक भाग बनला आहे. त्यामुळे अनेक लोक घरून काम करत आहेत. घरून काम केल्याने कंपनी आणि कर्मचारी दोघांचीही बरीच सोय झाली आहे. मात्र याचा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. एकाच जागी बसून दिवसभर लॅपटॉपवर (Laptop) किंवा संगणकावर काम करावे लागते. त्यामुळे शारीरिक हालचालही कमी झाल्या आहेत. हालचाली कमी असल्यामुळे शारीरिक थकवाही पुरेसा जाणवत नाही. याशिवाय स्नायूंमध्ये (Muscle) कडकपणा (Stiffness) येऊ लागतो, त्यामुळे वेदना आणि इतर समस्या वाढत आहेत. या समस्येपासून दूर राहायचे असेल तर, रोज तीन योगासने करण्याची सवय लावायला हवी. यातून शरीराची हालचाल होईल आणि स्नायूंनाही खूप आराम मिळेल.

1. ताडासन

ताडासन करण्यासाठी, सर्व प्रथम, दोन्ही पाय एकत्र ठेवून सरळ उभे रहा. यानंतर, आपल्या बोटांना दुमडून एकमेकांमध्ये अडकवा आणि आपले हात वर करा. यानंतर, हळूहळू जमिनीवरून आपली टाच उचला आणि श्वास सोडा. हात वर खेचून शरीर ताणा. काही वेळ या आसनात राहा, नंतर सामान्य स्थितीत या. हे किमान 4 ते 5 वेळा पुन्हा करा.

2. वृक्षासन

हे आसन करण्यासाठी तुम्हाला एका पायावर शरीर संतुलित करण्याची सवय करावी लागेल. यासाठी प्रथम उजवा पाय वर उचला आणि डाव्या मांडीवर आणा. डाव्या पायावर शरीराचे संतुलन करा. नमस्काराच्या मुद्रेत हात एकत्र आणा. हात जोडून वरच्या दिशेने हलवा. काही वेळ या आसनात राहा. त्यानंतर सामान्य स्थितीत परत या. दुसऱ्या पायाने समान क्रम पुन्हा करा. हे आसन किमान 4 ते 5 वेळा दोन्ही पायांनी करा.

3. दंडासन

दंडासन ही एक साधी मुद्रा आहे. हे करण्यासाठी जमिनीवर किंवा बेडवर बसावे. आता तुमचे दोन्ही पाय पसरवा आणि शक्य तितके पाय पुढे पसरवा. मांड्या एकत्र आणा त्यांना जोडा. आपली पाठ सरळ ठेवून, आपले तळवे आपल्या नितंबांच्या जवळ जमिनीवर ठेवा. यामुळे तुमच्या मांड्यांमध्ये ताण जाणवेल. यादरम्यान, सामान्यपणे श्वास आत घ्या आणिक सोडावा. काही वेळाने सामान्य स्थितीत यावे.

आणखी वाचा :

Health care : दररोज या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा आणि आरोग्यदायी जीवन जगा!

मुलाच्या वजन-उंचीमुळे तुम्ही त्रासले आहात? 6 पदार्थ तुमची चिंता करतील दूर

Health care : रोगांना दूर ठेवण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी दररोज चॉकलेटचा 1 तुकडा नक्की खा, वाचा अत्यंत महत्वाची माहिती!

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....