Acid reflux remedies : ‘अॅसिड रिफ्लक्स’नं त्रस्त आहात? ‘अशा’प्रकारे मिळेल आराम

Acid reflux remedies : ‘अॅसिड रिफ्लक्स’नं त्रस्त आहात? 'अशा'प्रकारे मिळेल आराम
अॅसिड रिफ्लक्स (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: Tv9

Acid reflux remedies : ‘अॅसिड रिफ्लक्स’पासून आराम मिळविण्यासाठी बरेच लोक अनेक उपचार करीत असतात. यात त्यांचा बराच पैसादेखील खर्च होत असतो. परंतु जीवनशैलीतील बदल आणि घरगुती उपायांनीही यावर सहज मात करता येऊ शकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

प्रदीप गरड

|

Mar 31, 2022 | 12:15 PM

Acid reflux remedies : पोटातील अॅसिड अन्ननलिका किंवा घशाच्या दिशेने जाते, तेव्हा ‘अॅसिड रिफ्लक्स’ची (Acid reflux) समस्या निर्माण होत असते. त्यामुळे छातीत आणि घशात जळजळ (Heartburn) आणि वेदना होतात. अमेरिकेत 15 पैकी एका व्यक्तीमध्ये अॅसिड रिफ्लक्सची समस्या निर्माण होत असते. विशेष म्हणजे त्या ठिकाणी ती खूप सामान्य समस्या आहे. आपल्या जीवनशैलीतील बदल व घरगुती उपायांनीही (Home remedies) यावर मात करता येऊ शकते, असा दावा आरोग्य तज्ज्ञांनी केला आहे. झोपताना शरीराची स्थिती कशी असते, यावरही बरेच काही अवलंबून असते. अॅसिड रिफ्लक्समुळे अनेकदा रात्री जास्त अस्वस्थता येते. कारण जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा पोटातून घशात अॅसिड रिफ्लक्सचा प्रवाह सुलभ होतो. त्यामुळे हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या झोपण्याच्या पद्धतीकडेही लक्ष दिले पाहिजे. 2011मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जे लोक आठवडाभर डोक्याच्या बाजूला 8 इंच बेड वर करून झोपले त्यांच्या छातीत जळजळ आणि झोपेच्या समस्यांमध्ये सुधारणा दिसून आली.

‘या’ पद्धतींचा अवलंब करा

1) डिग्लाइकाइरिजेनेटिड लिकोराइस (DGL) : ज्येष्ठमध एक औषधी वनस्पती आहे. पोटाशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी याचा पूर्वीपासून वापर केला जात आहे. डीजीएल हे लिकोरिसचे सुधारित रूप आहे. ज्यामध्ये ग्लायसिरीझिन संयुग काढून टाकले जाते. डीजीएल आपल्या अन्ननलिकेतील जळजळ होण्याची समस्या कमी करून अॅसिड रिफ्लक्समध्ये आराम देते. याशिवाय आलं, ‘कॅमोमाइल’ आणि ‘मार्शमॅलो’ या औषधी वनस्पतींचाही अॅसिड रिफ्लक्समध्ये फायदा होतो.

2) प्रमाणात आहार घ्या : एकाचवेळी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटाला अन्ननलिकेपासून वेगळे करणाऱ्या स्फिंक्टरवर (अवरोधीनी) दाब वाढतो. यामुळे स्फिंक्टर उघडण्याची आणि अॅसिड रिफ्लक्सचा प्रवाह वरच्या दिशेने जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी कमी प्रमाणात खा. उदाहरणार्थ, तीन वेळा खाण्यापेक्षा पाच वेळा कमी प्रमाणात खाणे चांगले.

3) कॉफीवर नियंत्रण ठेवा : जर तुम्हाला कॉफी प्यायला आवडत असेल तर त्याचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करा. कॉफी हे फक्त आम्लयुक्त पेय नसून ते प्यायल्यानंतर, तुमच्या पोटात जास्त अॅसिड तयार होते जे नंतर तुमच्या घशात जाते. आपले खालचे अन्ननलिका स्फिंक्टर देखील कॅफीनमुळे सुस्त होतात.

4) या गोष्टी टाळा : काही खाद्यपदार्थ अॅसिड रिफ्लक्सला चालना देण्याचे काम करतात. म्हणून, आपण अशा गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. यातून अनेकदा आपली पचनक्रिया मंदावते. चीज, तळलेले अन्न, चिप्ससारखे प्रक्रिया केलेले अन्न, खारवून वाळवलेले मांस, चॉकलेट, मिरची पावडर आणि पिझ्झासारखे फॅटी घटक यापासून दूर राहिले पाहिजे.

5) कोणत्या गोष्टी खाव्यात? : आम्लयुक्त घटकांऐवजी अल्कालाईन पदार्थ खाणे योग्य असते. उच्च पीएच पातळी असलेल्या गोष्टींमध्ये अल्कालाईन अधिक असते. यामध्ये फूलकोबी, बडीशेप आणि केळी यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

6) अधिक फायबरयुक्त आहार घ्या : 2018च्या एका अभ्यासानुसार, नॉन-इरोसिव्ह अॅसिड रिफ्लक्सचा त्रास असलेले लोक फार कमी प्रमाणात आपल्या आहारात फायबरचा समावेश करतात. त्यांनी सायलियम फायबर सप्लिमेंट्स घेतल्यानंतर त्यांच्यात अॅसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ कमी झाल्याचे दिसून आले आहे. फायबरमुळे आपली भूक बराच काळ कमी होऊ शकते, त्यामुळे अॅसिड रिफ्लक्स कमी होण्याची शक्यतादेखील कमी होते.

7) जेवल्यानंतर हे करा : जेवल्यानंतर सुमारे तीन तास ताठ उभे राहिल्याने अॅसिड रिफ्लक्सची समस्याही संपुष्टात येते. याचा अर्थ असा की जर तुम्ही झोपण्याच्या काही तास आधी रात्रीचे जेवण केले तर तुम्हाला चालायला किंवा उभे राहण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा गुरुत्वाकर्षण शक्ती चांगली काम करते. व तुम्ही अॅसिड रिफ्लक्सच्या समस्येपासूनही लांब राहता.

8) डाव्या बाजूला झोपा : डाव्या बाजूला झोपल्याने अॅसिड रिफ्लक्सदेखील टाळता येते. 2015मध्ये एका अभ्यासानुसार, जे लोक शरीराचा वरचा भाग डाव्या बाजूने किंचित उंच करून झोपतात त्यांच्यात अॅसिड रिफ्लक्सची समस्या कमी दिसून येते. 2006 मधील अभ्यासांच्या विश्लेषणानुसार, जे लोक त्यांच्या उजव्या बाजूला झोपतात त्यांना अॅसिड रिफ्लक्स होण्याची अधिक शक्यता असते.

9) कोरफडचा रस परिणामकारक : काही अभ्यासानुसार कोरफडचा रस सेवन केल्याने या समस्येपासून आराम मिळू शकतो. 2015मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज सुमारे 10 मिली हा रस प्यायल्याने अॅसिड रिफ्लक्समध्ये आराम मिळतो. ही रेसिपी औषधांपेक्षा जास्त प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आले.

आणखी वाचा :

पोटाच्या विकारांपासून राहा दूर… आहारात ‘या’ सुपरफूडचा समावेश करा

Weight Loss: पोटाची नको असलेली चरबी बर्न करण्यासाठी हे 3 चहा अत्यंत फायदेशीर!

Health Care : मधुमेह व पायाचे आजार आणि उपचार जाणून घ्या डाॅक्टरांकडून सविस्तरपणे! 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें