वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? मग हे घरगुती पेय नक्कीच ठरतील फायदेशीर
वजन जास्त वाढू लागल्यास त्वरित लक्ष देणे आवश्यक असते. वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष केल्यास अनेक आजार होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच वेळेच्या आधी म्हातारपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पण काही वेळेला अनेक प्रयत्न करून देखील वजन कमी होत नाही. त्यासाठी काही घरगुती पेय फायदेशीर ठरू शकतात.

वजन वाढणे म्हणजे शरीरातील आजार वाढणे असा याचा अर्थ होतो. याशिवाय जास्त वजनामुळे दैनंदिन जीवनात अनेक समस्या उद्भवतात. तुमचा आवडता पोशाख तुम्हाला घालता येत नाही, शरीर आकारहीन दिसल्याने आत्मविश्वास कमी होतो. त्यासोबतच काम करताना लवकर थकवा येणे, पायऱ्या चढताना धाप लागणे आणि सहनशक्ती कमी होणे या सर्व गोष्टी वजन वाढल्याने होऊ लागतात. जर तुमचे वजन खूप वाढले तर तुम्हाला उठणे आणि बसायला त्रास होऊ लागतो. आजकालच्या तरुणांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिसून येत आहे. सध्या प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे आहे आणि यासाठी लोक अनेक गोष्टी करतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमची चयापचय क्रिया बरोबर असणे गरजेचे आहे आणि हे फक्त खाण्याच्या चांगल्या सवयीमुळे शक्य होते.
वजन कमी करणे हे एक अवघड काम असले तरी पण ते अशक्य नाही. तुम्हाला फक्त थोडी मेहनत आणि संयम ठेवावा लागेल. जर तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या दैनंदिन जीवनात काही घरगुती पेय तुम्ही समाविष्ट करू शकतात. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
आवळ्याचे पेय
आवळा हा कसा घटक आहे जो अनेक अँटिऑक्सिडंट ने समृद्ध आहे. त्यामुळे त्याचे एकच नाही तर अनेक फायदे होतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी एक आवळा, थोडेसे काळे मीठ, चार ते पाच काळ्यामिरी, आल्याचा एक छोटा तुकडा आणि चार ते पाच कढीपत्त्याचे पाने घेऊन किंचित पाणी टाकून त्याला मिक्सर मधून बारीक करून घ्या. त्यानंतर हे गाळून घ्या मग प्या. यामुळे वजन कमी होईल आणि त्यासोबतच त्वचा चमकदार होण्यासोबतच केस गळणे देखील थांबेल.
लिंबू आणि मधाचे पेय
मध आणि लिंबू हे देखील वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. लिंबाचा रस आणि एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. यामुळे तुमची एनर्जी वाढेल आणि तुमचे शरीर डिटॉक्स होईल.
जिऱ्याचे पेय
जर तुमचे वजन कमी होत नसेल तर तुम्ही जिऱ्याचे पाणी पिऊ शकता यामुळे चयापचय वाढवते. हे पेय बनवण्यासाठी एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा आणि हे पाणी सकाळी उकळून घ्या. ते थोडे कोमट झाल्यानंतर त्याला गाळून ते पाणी प्या. यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल.
हळद आणि काळी मिरीचे पेय
काळी मिरी चरबी जाण्यास मदत करते. तर हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन कंपाऊंड वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासोबतच हे पेय शरीराला डिटॉक्सिफाय करते. कच्चा हळदीचा एक छोटा तुकडा ठेचून घ्या आणि पाच काळया मिरी ठेचून घ्या. दीड कप पाण्यामध्ये या दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे उकळा. हे पेय सकाळी उपाशीपोटी प्या. त्याचा वजन कमी होण्यासाठी फायदा होईल.
