AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लघवीतून पुरुषांमध्ये भयंकर इन्फेक्शन! हे तुम्हाला माहीत असेल, पण असं का होतं हे माहितीये?

पुरुषांमध्ये देखील यूरीनरी ट्रॅक इंफेक्शन होऊ शकते. आपल्यापैकी अनेकांना UTI( यूरीनरी ट्रॅक इंफेक्शन) ची समस्या त्रास देऊ शकते.. अनेकांना डायबिटीस असते ,अशा वेळी लघवी करताना जळजळ होणे,लघवीला त्रास होणे, मूत्रमार्ग मध्ये इन्फेक्शन होणे, वारंवार लघवी लागणे, यासारखी लक्षणे उद्भवत असतात. ही UTI यूरीनरी ट्रॅक इंफेक्शन समस्या साधारणतः महिलांमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते.

लघवीतून पुरुषांमध्ये भयंकर इन्फेक्शन! हे तुम्हाला माहीत असेल, पण असं का होतं हे माहितीये?
वारंवार लघवीला जाणे
| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 2:43 AM
Share

धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना वेगवेगळ्या समस्या त्रास देत असतात. बहुतेक वेळा लघवीच्या समस्येकडे आपण दुर्लक्ष करत असतो. आपल्यापैकी अनेकांना मूत्राशयातील इन्फेक्शन, लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणे, लघवी थांबून थांबून होणे, लघवी करताना प्रचंड वेदना होणे, लघवीच्या जागेवर सूज निर्माण होणे अशा अनेक समस्या उद्भवत असतात परंतु या सगळ्या समस्या इन्फेक्शन मुळे तर होत नाही ना? हे जाणून घेणे गरजेचे आहे.

लघवीतून पुरुषांमध्ये इन्फेक्शन का होते?

UTI म्हणजे यूरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शन. ही साधारणतः महिलांमध्ये उद्भवणारी समस्या आहे यामागे त्यांची शरीराची रचना जबाबदार असते परंतु पुरुषांमध्ये सुद्धा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकते.

लघवीतून पुरुषांमध्ये इन्फेक्शन होण्याची कारणे ?

पुरुषांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की डायबिटीज हे एक रिस्क फॅक्टर आहे. एसटीआय (STI) म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन, हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण असू शकते.अनेकदा काही सर्जिकल कारणं सुद्धा असतात.

UTI इन्फेक्शन झाल्याचा संशय असेल तर काही टेस्ट सुद्धा केल्या जाऊ शकतात.

  • जसे की वाढत्या वयात बिनाइन प्रोस्टेटिक हाइपरप्लेसिया (प्रोस्टेट ग्रंथी ची वाढ होणे), स्ट्रिक्चर यूरेथ्रा (मूत्र मार्गात अडथळा होणे, सूज), मुतखड्याचा आजार. या सर्व कारणांमुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन सुद्धा होऊ शकते.

पुरुषांमध्ये यूरीनरी ट्रॅक इंफेक्शन होण्यामागे अनेक कारणे असू शकतील.

पुरुषांमध्ये देखील यूरीनरी ट्रॅक इंफेक्शन होऊ शकते. आपल्यापैकी अनेकांना UTI( यूरीनरी ट्रॅक इंफेक्शन) ची समस्या त्रास देऊ शकते.. अनेकांना डायबिटीस असते ,अशा वेळी लघवी करताना जळजळ होणे,लघवीला त्रास होणे, मूत्रमार्ग मध्ये इन्फेक्शन होणे, वारंवार लघवी लागणे, यासारखी लक्षणे उद्भवत असतात. ही UTI यूरीनरी ट्रॅक इंफेक्शन समस्या साधारणतः महिलांमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते. पुरुषांमध्ये देखील ही समस्या होऊ शकते या समस्येबद्दल अनेकांना माहिती नसते म्हणून अनेकदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे योग्य ते उपचार सुद्धा होत नाही व भविष्यात अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आज आपण या समस्येबद्दल व ही समस्या जर आपल्याला झाली असेल तर त्याची नेमकी लक्षणे काय काय असतात याबद्दल जाणून घेणार आहोत.

लक्षणे :- वारंवार लघवीला जावे लागणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवी झाल्यानंतर आग जाणवणे लघवी व्यवस्थित न होता थांबून थांबून होणे इत्यादी..

तपासणी :

जर तुम्हाला असे वाटत असेल की,आपल्याला UTI ची लक्षणं जाणवत आहेत तर अश्यावेळी काही टेस्ट सुद्धा आपण करू शकतो. हि टेस्ट यूरिन इन्फेक्शन डायग्नोसिसची पूर्तता करते,जसे की लघवीचे दैनंदिन तपासणी करणे, यूरिन कल्चर ,अल्ट्रासाउंड तपासणी करणे. इत्यादी..

उपचार :

टेस्ट केल्यावर UTI झाले आहे असे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा एक विशेष अँटीबायोटिक दिली जाते.ही गोळी लेबोरेटरी द्वारा आपणास सजेस्ट केली जाते. सेंसिटिव अँटीबायोटिक पद्धतीने UTI चे उपचार केले जाते. पुरूषांमध्ये जर प्रोस्टेट वाढले असेल, स्ट्रिक्चर असेल, कधी कधी फोरस्किनच्या आतील भागास इन्फेक्शन झाले असल्यास याचा प्रसार होतो. लक्षणं पाहून या आजारावर उपचार केले जातात. जर काही रिस्क फॅक्टर असेल जसे की डायबिटीज तर त्याचे सुद्धा उपचार केले जाते जेणेकरून समस्या मुळापासून नष्ट होईल.UTI हे मूत्रनलिकेमध्ये कुठेही होऊ शकतो, डॉक्टर दारे योग्य तपासणी व उपचार पद्धती घेणे अत्यंत गरजेचं आहे. योग्य अँटिबायोटिक औषधे सेवन करायला हवीत. कोणतीही अँटिबायोटिक्स स्वतः मनाने आणि एकदमच सुरू करू नका, यामुळे तुम्ही घेतलेल्या अँटिबायोटिक औषधांचा प्रभाव हळूहळू कमी होऊन जाईल आणि त्याचा तुम्हाला लाभ सुद्धा प्राप्त होणार नाही. UTI सोबत जर तुम्हाला अन्य कोणतेही आजार व इन्फेक्शन असेल तर त्याचा उपचार करणे कठीण होऊन जाईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की,वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे हे लक्षण आहेत. आता हे UTI आपल्याला कोण कोणत्या कारणांमुळे होते याबद्दल डॉक्टरांनी आपल्याला सांगितले आहे परंतु डायबिटीज हे समस्येचे महत्त्वाचे कारण आहे म्हणून जर तुम्हाला सुद्धा यूटीआय चे लक्षणे जाणवत असतील तर तर स्वतः कोणत्याही प्रकारचे औषध सेवन करू नका. नजदिकच्या डॉक्टरांना अवश्य भेट द्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कोणतेही औषध सेवन करा.

( या बातमीमध्ये सांगितले गेले उपचार आणि पद्धती या सगळ्या बाबी तज्ञ डॉक्टर मंडळी यांच्या अनुभवानुसार सांगण्यात आलेले आहे, जर कुणाला सल्ल्याची आवश्यकता असेल , सांगितलेले उपाय प्रत्यक्षात जर करायचे असतील तर त्यापूर्वी आपल्या जवळील डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. टीव्ही 9 तुम्हाला स्वतःहून कोणत्याही प्रकारचे औषध सेवन करण्याचे सल्ले अजिबात देत नाहीये.)

हे सुद्धा वाचा: Abdul Sattar: शिवसेनेचे राज्य मंत्री अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर महाराष्ट्रभर चर्चांना उधाण

Egg Price Today: अंडा मार्केटवर ‘ओमिक्रॉन’चं सावट: मागणीत निम्म्यानं घट, भावात प्रचंड घसरण

Saibai: महाराणी छत्रपती सईबाई यांच्या समाधीस्थळ परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...