AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरव्हाकल कॅन्सरवरील पहीली देशी लस या महिन्यात बाजारात येणार, जाणून घ्या सर्व माहिती

गर्भाशयाच्या कर्करोग नियंत्रणासाठी ह्युमन पॅपिलोमा लसीकरण महत्वाचे असते. साधारणत: वयाच्या 11 ते 12 व्या वर्षांपासू ही लस घेणे फायद्याचे ठरते. या लसीच्या तीन मात्र दिल्या जातात.

सरव्हाकल कॅन्सरवरील पहीली देशी लस या महिन्यात बाजारात येणार, जाणून घ्या सर्व माहिती
cervical-cancer-vaccineImage Credit source: cervical-cancer-vaccine
| Updated on: Feb 10, 2023 | 11:24 AM
Share

मुंबई : सरव्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ( cervical-cancer-vaccine ) रोखणारी पहिली देशी लस या महिन्यात बाजारात येत आहे. पुण्याच्या प्रसिद्ध सिरम ( SERUM ) इन्सिट्यूटने ही लस विकसित केली आहे. सिरम इन्सिट्यूटने याआधी कोरोनाकाळात सिरमने लस विकसित करून आघाडी घेतल्याने भारताला कोरोनाचा संसर्ग थांबविता आला होता. आता सिरम इन्स्टिट्यूटने महीलांना होणाऱ्या गंभीर आजारावर देशातच स्वत: ची लस ( VACCINE ) विकसित केली आहे.

पुणे येथील दि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया ( SII ) ने सरव्हायकल ही लस विकसित केली आहे. या लसची किंमत 2,000 रूपये असून एका व्हायल मधून दोन डोस देता येणार आहे. या संदर्भात पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे. सरव्हायकल कॅन्सरला गर्भाशयाचा कॅन्सर म्हटले जात असते. या आजार नेमका काय आहे ते पाहूयात…

ग्रीवा हा गर्भपिशवी व योनीमार्ग यांना जोडणारा अवयव आहे. ग्रीवेचा कर्करोग स्थानिक पेशींच्या असामान्य वाढीमुळे दोन प्रकारात मोडला जातो. अॅडिनोकारसीनोमा व स्क्वामस सेल कारसीनोमा. दोन्हीपैकी स्क्वामस सेल प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण जगामध्ये अधिक आहे. ग्रीवेचा कर्करोग प्राधान्याने पन्नाशीतील महिलांमध्ये आढळून यायचा, पण मागील दशकापासून तरुण महिलांमध्येही या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. कमी वयात होणाऱ्या कर्करोगाच्या कारणांमध्ये लैंगिक स्वैराचार हे एक महत्त्वाचे कारण समजले जाते. ग्रीवेच्या कर्करोगाला अनेक घटक कारणीभूत ठरतात.

जोखीम वाढवणारे घटक लहानपणापासून शारीरिक संबंध, कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचा अस्वीकार, अनेक व्यक्तींशी शारीरिक संबंध, वारंवार गर्भधारणा किंवा गर्भपात, गर्भनिरोधक गोळ्यांचे अधिक काळपर्यंत सेवन, धूम्रपान, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.

एचआयव्ही अथवा लैंगिक संबंधामुळे पसरणारे इतर रोग ह्युमन पॅपिलोया विषाणूचा ह्युमन पॅपिलोया वायरस (एचपीव्ही) चा संसर्ग हा ग्रीवेच्या कर्करोगाचे महत्त्वाचे कारण आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर ग्रीवेच्या पेशींमध्ये मध्ये बदल घडण्यास सुरुवात होते. बदल घडायला लागल्यापासून असामान्य वाढ होईपर्यंत दहा वर्षांपेक्षा जास्त काळ जातो. सुरुवातीच्या काळातील आढळणारी सामान्य लक्षणे दुर्लक्षित झाल्यामुळे या कर्करोगाचे निदान उशिरा होण्याची शक्यता असते.

ग्रीवेच्या कर्करोगाचे निदान लवकर होऊ शकते

उशिरा दिसून येणाऱ्या लक्षणांमध्ये शरीर संबंधानंतर असामान्य रक्तस्राव होणे हे प्रमुख कारण होय. शिवाय भूक न लागणे, वजन कमी होणे, पायावर सूज येणे, पोटावर सूज असणे, लघवी किंवा शौचावाटे रक्तस्राव होणे इत्यादी लक्षणेसुद्धा उशिरा आढळतात. ग्रीवेच्या कर्करोगाचे निदान प्राथिमक अवस्थेत होणे सहज शक्य असते. लवकर निदान होण्याकरिता सर्व महिलांनी वयाच्या 35 व्या वर्षापासून आपल्या स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अधिक जोखमीची लैंगिक वागणूक असणाऱ्या व्यक्तींनी न चुकता वर्षातून कमीत कमी एकदा तरी स्त्री रोग तज्ज्ञाचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

एचपीव्ही डीएनए – ह्युमन पॅपिलोमा विषाणूचा संसर्ग जाणून घेण्यासाठी ही चाचणी केली जाते. कॉल्पोस्कोपी- यात दुर्बिणद्वारे ग्रीवा व योनीमार्गाचा सखोल अभ्यास करून सामान्य न दिसणाऱ्या भागातील बायप्सी घेतली जाते. एमआरआय – ही तपासणी कर्करोगाच्या नंतरच्या स्थितीत शरीरातील प्रसार जाणून घेण्यासाठी करतात. या कर्करोगात सुरुवातीच्या काळात शस्त्रिक्रियेद्वारे 90 टक्के रुग्ण बरे होऊ शकतात. पण नंतरच्या टप्प्यात रेडिओथेरपी उपचार पद्धतीचा उपयोग केला जातो. हा कर्करोग नियंत्रणासाठी ह्युमन पॅपिलोमा लसीकरण हा एक मोठा टप्पा ठरू शकतो. साधारणत: वयाच्या 11ते 12 व्या वर्षांपासू ही लस घेणे फायद्याचे ठरते. या लसीच्या तीन मात्र दिल्या जातात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.