AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक: पेपर हातात पडताच विद्यार्थ्याला दरदरुन घाम! शाळेचं नाव काढताच कापरं, नांदेडमध्ये काय घडलं?

शाळेत शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संपूर्ण वर्रगासमोर द्यावे लागत होते. त्यातून विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी होण्यास मदत होत होती. चुकले तर मुले हसत होती. त्यामुळे मनातील भीती कमी होत असे. मात्र आता ऑनलाइनमुळे हे सगळं बंद झालंय. जसजशा शाळा ऑफलाइन होती, तसे मानसिकतेतही बदल होत जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

धक्कादायक: पेपर हातात पडताच विद्यार्थ्याला दरदरुन घाम! शाळेचं नाव काढताच कापरं, नांदेडमध्ये काय घडलं?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Feb 03, 2022 | 11:30 AM
Share

नांदेड: कोरोना स्थितीमुळे दोन वर्षांपासून विद्यार्थी शाळेत (School Student) जाऊ शकत नाहीयेत. वर्गात बसणे, इतर मुलांसोबत बोलणे, खेळणे, समुहात वावरण्याची सवय असलेल्या मुलांना अचानक घरातच बसावे लागले. काही मुलांवर याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. नांदेडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. अनेक दिवसानंतर शाळा सुरु (School opens) झाली. विद्यार्थ्यांना वर्गात परीक्षेसाठी पेपर देण्यात आले (Offline exam) आणि एका चौथीच्या वर्गातल्या मुलाला अक्षरशः घाम फुटला. विद्यार्थ्यी अचानक अत्यवस्थ झाला. शाळेतील इतर विद्यार्थी आणि शिक्षकांची या प्रकाराचा त्वरीत दखल घेऊन त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले. विद्यार्थ्याला अचानक असे काय झाले, याचा उलगडा अखेर डॉक्टरांनीच केला.

शाळा सुरु होताच परीक्षा कशी ?

कोरोनामुळे मागील दोन वर्षे ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवण्यात आला. जानेवारी महिन्यात काही दिवसांसाठी शाळा सुरु झाल्या होत्या. मात्र ओमिक्रॉन संकटामुळे पुन्हा बंद झाल्या. त्यानंतर यंदाच्या आठवड्यात पुन्हा शाळा सुरु झाल्या. ऑनलाइन अभ्यासक्रम मुलांना किती समजला, याची चाचपणी करण्यासाठी चौथीच्या वर्गात परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पेपर हातात देण्यात आले. परंतु पेपर हातात पडताच इतर काही मुले रडायला लागली, तर एका मुलाला दरदरून घाम फुटला. तो अत्यवस्थ झाला. शिक्षकांवनी तत्काळ पालकांशी संपर्क साधल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

शाळेचं नाव घेताच थरथर कापतोय

रुग्णालयात औषधोपचार दिल्यानंतर सदर विद्यार्थ्याला घरी आणले गेले. मात्र पुन्हा शाळेत जाण्याच्या नावानेच तो थरथर कापू लागला. मी नापास होणार, मला काहीच येत नाही, असे सारखा बडबड करतोय. त्यामुळे काळजीत पडलेल्या पालकांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले. औषधोपचारांनी त्याची मानसिकता बदलत आहे. मात्र अजूनही शाळेचा विषय काढताच त्याच्या अंगाचा थरकाप उडतो. कोरोनामुळे शाळेशी तुटलेला संपर्क अशा प्रकारेही गंभीर परिणाम करू शकतो, हे यातून समोर आले आहे.

पालक काय म्हणतात?

पालकांची विचारपूस केली असता, सदर विद्यार्थी दोन वर्षे ऑनलाइन शाळा करत होता. मात्र तो अनेकदा दांडी मारत होता. आता तर शाळेचं नाव काढलं तरी एकदम घाबरून जातो, रडतो, असं पालकांनी सांगितलं. आता त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरु आहेत, असं पालकांनी सांगितलं.

ऑनलाइन शिक्षणामुळे संवाद हरपला!

दैनिक लोकमतमध्ये प्रसारीत वृत्तानुसार, मनासोपचार तज्ज्ञ डॉ. रामेश्वर बोले यांनी सांगितले की, ऑनलाइन अभ्यासामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवाद हरवला. शाळेत शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर संपूर्ण वर्रगासमोर द्यावे लागत होते. त्यातून विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी होण्यास मदत होत होती. चुकले तर मुले हसत होती. त्यामुळे मनातील भीती कमी होत असे. मात्र आता ऑनलाइनमुळे हे सगळं बंद झालंय. दोन तास बसून पेपर सोडवण्याचीही मुलांना सवय राहिलेली नाही. त्यामुळे जसजशा शाळा ऑफलाइन होती, तसे मानसिकतेतही बदल होत जाईल, असे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या-

Amravati | डॉक्टर, कर्मचारी दारुच्या नशेत, रुग्णलयात आढळल्या बॉटल; वरिष्ठ येताच धक्कादायक प्रकार समोर

Mahesh Manjarekar : महेश मांजरेकरांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, आता बिग मराठीचं सूत्रसंचालन कोण करणार?

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.