Health : चांगला फिटनेस हवाय? उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक महिलेच्या फोनमध्ये असावेत ‘हे’ 5 अॅप

तुमच्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेण्यासाठी इंटरनेटवर अनेक अॅप्स आहेत. प्रत्येक स्त्रीला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असते. महिलांच्या आरोग्य आणि फिटनेससोबतच महिला तंत्रज्ञानाच्या मदतीने आहार आणि मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठीही अॅप्स विकसित करण्यात आले आहेत.

Health : चांगला फिटनेस हवाय? उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक महिलेच्या फोनमध्ये असावेत ‘हे’ 5 अॅप
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 1:51 PM

जर तुम्ही एक महिला (Woman) असाल आणि तुमचे आरोग्य दीर्घकाळ चांगले रeहावे यासाठी तुम्ही प्रयत्न करणार असाल तर हा लेख तुमच्या उपयोगी येऊ शकतो. या सर्व बाबींमध्ये FemTech अॅप्स तुम्हाला चांगली मदत करू शकेल. महिलांचे आरोग्य, फिटनेस (Fitness) आणि मासिक पाळी इत्यादींसाठी बाजारात अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. म्हणूनच आम्ही या लेखातून महिलांसाठी उपयुक्त असलेल्या अशा टॉप 5 अॅप्सची (Apps) माहिती देणार आहोत, ज्यांचा वापर करून महिला आपले आरोग्य अधिक चांगले राखू शकतात. तुमच्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेण्यासाठी इंटरनेटवर अनेक अॅप्स आहेत. प्रत्येक स्त्रीला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असते. महिलांच्या आरोग्य आणि फिटनेससोबतच महिला तंत्रज्ञानाच्या मदतीने आहार आणि मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठीही अॅप्स विकसित करण्यात आले आहेत.

Maya App : माया अॅपने 2017 या वर्षासाठी फेसबुकचा प्रतिष्ठित FbStart अॅप्स पुरस्कार जिंकला आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. महिला या अॅपचा वापर करून त्यांच्या मासिक पाळीचा मागोवा घेऊ शकतात. याशिवाय हे अॅप मूड स्विंग्ज, गर्भधारणा आणि तुमच्या एकूण आरोग्याविषयी माहिती देते.

Health Sathi App : हे अॅप केवळ महिलांसाठीच फायदेशीर नाही, तर मुलांची विशेष काळजीही घेते. आरोग्य साथी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. हे अॅप बेबीसिटिंगची सेवा देखील देते. आरोग्य साथी अॅपने घरच्या घरी जेनेटिक टेस्ट करण्यासाठी अधिकृत सरकारी चाचणी एजन्सीशी करार केला आहे.

हे सुद्धा वाचा

Flo App : जगभरात 23 कोटींहून अधिक महिलांनी फ्लो अॅप डाउनलोड केले आहे. हे अॅप महिलांना ओव्हुलेशन आणि मासिक पाळी, प्रजनन क्षमता ट्रॅक करण्यास मदत करते. फ्लो अॅप गर्भधारणा सहाय्यक म्हणून देखील कार्य करते.

Aaptiv : जर तुम्ही फिटनेस फ्रीक असाल आणि व्यायाम केल्याशिवाय होत नसेल तर तुम्हाला Aaptiv ची गरज आहे. हे अॅप ऑडिओ आणि व्हिडिओ फिटनेस वर्कआउटसह तुमची फिटनेस गोल पूर्ण करण्यात मदत करते. Aaptiv अॅप तुम्हाला फिटनेस प्रशिक्षकाशी देखील कनेक्ट करते.

MyFitnessPal : हे अॅप तुम्हाला तुमचा आहार, फिटनेस, वजन कमी करणे आणि पिण्याचे पाणी ट्रॅक करण्यास मदत करते. हे सर्व-इन-वन फूड ट्रॅकर आणि हेल्थ अॅप आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमी आपल्याला आहार, आरोग्य, व्यायाम आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन मिळत असते.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.