10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे फिटनेस बँड

हल्ली फिटनेस बँडची क्रेझ वाढत आहे. जर तुम्हीही फिटनेस बँड खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 10 हजारपेक्षा कमी किमतीतील हे पर्याय तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरु शकतात.

10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे फिटनेस बँड
Follow us
| Updated on: Jul 30, 2019 | 4:46 PM

मुंबई : हल्ली फिटनेस बँडची क्रेझ वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तरुण पिढीच्या मनगटावर घड्याळाऐवजी फिटनेस बँड दिसू लागेल आहे. फक्त फिटनेस फ्रिक असणारेच नव्हे तर टेक्नोसेव्ही असणारेही अनेक जण फिटनेस बँडचा वापर करतात. जर तुम्हीही फिटनेस बँड खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 10 हजारपेक्षा कमी किमतीतील हे पर्याय तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरु शकतात.

MI BAND 3

सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या फिटनेस बँडच्या सीरीजमध्ये हे टॉप वेरियंट आहे. MI BAND 3 ची किंमत 1 हजार 999 रुपये आहे. विशेष म्हणजे याची बॅटरी 20 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकते. तसेच या बँडमध्ये ओएलईडी टच डिस्प्लेही देण्यात आला आहे. त्यामुळे या घड्याळाचा लूकही छान येतो. त्याशिवाय हे बँड वॉटरफ्रुपही आहे.

Huawei बँड 2 प्रो

Huawei बँडची किंमत 5  हजार 390 रुपये आहे. या बँडमध्ये जास्त काळ टिकणाऱ्या बॅटरीसोबत, हार्ट बीट सेन्सर आणि VO2 मॅक्स यासारखे फिर्चस देण्यात आलेत. विशेष म्हणजे या फिटनेट बँडद्वारे तुम्ही किती वेळ झोपता हेही समजते.

Garmin वीवोफिट 3

या फिटनेस बँडची किंमत 6 हजार 999 रुपये आहे. याची बॅटरी लाईफ उत्तम आहे. विशेष म्हणजे याची बॅटरी 365 दिवसांपर्यंत टिकते असाही अनेक टेक कंपन्यांनी दावा केला आहे. या बँड उत्तम फिचर्स आहेत. मात्र या फिटनेस बँडचा डिस्प्ले इतर बँडपेक्षा फार लहान आहे.

Amazfit

Amazfit या फिटनेस बँडची किंमत 5 हजार 390 रुपये आहे. हे घड्याळ फिटनेस फ्रीक लोकांसाठी बेस्ट आहे. हे बँड घातल्यावर अपलच्या फिटनेस बँडप्रमाणे वाटते. ज्यामुळे हे बँड घातल्यावर अनेकांची यावर नजर पडते. यात मल्टी स्पॉर्ट्स टॅक्रिंगसोबतच वीओ 2 मॅक्स फिचर्सही दिले आहेत.

Garmin वीवोस्मार्ट

या फिटनेस बँडची किंमत 9 हजार 780 रुपये आहे. या फिटनेस बँड सर्वच बाबतीत परिपूर्ण आहे. या बँडमध्ये जीपीएस सिस्टम ही देण्यात आली आहे. या फिटनेस बँडची बॅटरी एक आठवड्यापर्यंत राहते.

Fitbit charge 2

फिटबिट ही कंपनी बँडसाठी अतिशय उत्तम मानले जाते. त्याची किंमत 9 हजार 750 रुपये आहे. हे फिटनेस बँड किंमतीच्या मानाने महाग वाटत असले, तरी यात सर्व सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. यात जीपीएस, हार्ट रेट सेंसर देण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.