AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किडनीचे फंक्शन खराब होण्याचे हे आहेत संकेत, अशी आहेत सुरूवातीची लक्षणे

किडन्यांचे आरोग्य राखणे महत्वाचे असते. किडनी फंक्शन खराब झाल्याची काय आहेत नेमकी लक्षणे, काय घ्यायची असते काळजी

किडनीचे फंक्शन खराब होण्याचे हे आहेत संकेत, अशी आहेत सुरूवातीची लक्षणे
KIDNEYImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 20, 2023 | 10:43 AM
Share

नवी दिल्ली : किडनी आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव आहे. त्याचे आरोग्य उत्तम राखणे आपल्या हातात आहे. दोन किडन्यांनी काम करणे बंद केले तर आपण जगूच शकणार नाही. त्यामुळे किडन्यांचे आरोग्य जपणे महत्वाचे आहे. आपण जो आहार घेतो त्यातून अनेक वेळा टॉक्सीन पदार्थ ही पोटात जात असतात. हे टॉक्सिन रक्तात जमा होते. रक्ताची गाळण करण्याचे काम किडनी करीत असते. रक्तातील टॉक्सिन गाळून ते मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचे काम किडन्या करीत असतात.

अशा प्रकारे किडनी एखाद्या गाळणीचे काम करीत असते. सर्व प्रकारच्या टाकाऊ पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम किडन्या करीत असतात. त्यांचे आरोग्य राखणे महत्वाचे असते. जर टाकाऊ घटक शरीराबाहेर पडणे बंद झाले तरी आपले आरोग्य बिघडू शकते. म्हणून किडनीचे आरोग्य जपायला हवे आहे.

किडनीचे कार्य काय आहे…

पुण्याच्या सह्याद्री रूग्णालयातील मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सचिन पाटील यांच्या मते किडनी आपल्या शरीरातील टाकाऊ घटकांना बाहेर काढत असते. शरीरातील तरल पदार्थांचे ती संतुलन राखत असते. शरीरातील अतिरिक्त सोडीयम, फॉस्फरस, पाणी, मीठ, पॉटेशियम आदी पदार्थ ती बाहेर टाकते. आपल्या शरीरातील रक्त दिवसातून चाळीस वेळा किडनीद्वारे फिल्टर होत असते. आपल्या शरीरातील ह्दयातून निघणाऱ्या रक्तापैकी 20 टक्के रक्त किडनीत पोहचते. आणि किडनी 24 तास ते गाळण्याचे काम करीत असते. किडनी सोडीयम, कॅल्सियम, मिनरल्स, पाणी, फॉस्फरस, हिमोग्लोबिनचे संतूलन राखत असते.

लघवीचे कार्य बिघडणे –

शरीरातील टाकाऊ घटक लघवीतून बाहेर पडत असतात. लघवीचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे, लघवीचा रंग बदलणे, लघवीला वास येणे, किडनीवर लोड आल्यास लघवीतून प्रोटीन जाऊ लागते. तेव्हा लघवीला खूप फेस येतो. पायांना सूज – किडनीचे कार्य बिघडल्यास हिमोग्लोबिनचे संतुलन बिघडते. त्यामुळे पायांना सूज येते. डोळ्यांच्या खाली सूज येते. त्यामुळे थकवाही वाढतो.

भूक कमी लागणे –

जेव्हा किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ काढण्याचे काम थांबवते तेव्हा तेव्हा ते शरीरात साठू लागतात. त्यामुळे उलटी होते, वजन कमी होते, पोटात दुखते, भूक कमी लागते.

एकाग्रता कमी होते –

आपले मन कशात लागत नाही, एकाग्रता कमी लागते, आणि अचानक माणूस बेशुद्ध होऊ शकतो.

दम लागणे –

काहीवेळा किडनी फंक्शन नीट न झाल्यास फप्फुसांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे श्वास घेण्यास वेळ लागू शकतो.

स्किनवर रॅशेस –

जर रक्त शुद्धीकरण होत नसेल तर त्वचेवर चट्टे उमटू शकतात, खाज येऊ शकते.

इम्युनिटी कमजोर होणे –

किडनी खराब झाल्यास इम्युनिटीही कमजोर होते, त्यामुळे इंफेक्शन होण्याचा धोका वाढतो.

किडनीचा आजार झाल्यावर काय करावे – 

किडनीचा आजार झाल्यास नेफ्रोलॉजीस्टना भेटावे तसेच किडनी फंक्शनच्या चाचण्या कराव्यात. सोनोग्राफी केल्यास किडनीचा आकार, किडनी स्टोन असेल तर कळू शकते. तसेच आपले राहणीमान बदलावे, रोज व्यायाम करावा, पेन किलरच्या गोळ्या डॉक्टरांच्या शिवाय मनाप्रमाणे खाऊ नयेत. शुगर किंवा बीपीचा त्रास असेल तर त्याच्याउपचार करावा. मेडीटेशन, योगा, श्वासाचे व्यायाम करावा.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच