AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज एक महिना रिकाम्यापोटी लवंग चघळण्याने मिळतील हे चमत्कारिक फायदे

आयुर्वेदात लवंगाच्या औषधी गुणामुळे त्याला महत्वाचे स्थान आहे. हा केवळ मसालाच्या पदार्थ नसून एक शक्तीशाली औषध देखील आहे, लवंगाचे इतके फायदे आहेत की त्याच्या सेवनाने संपूर्ण आरोग्य ठणठणीत होते

रोज एक महिना रिकाम्यापोटी लवंग चघळण्याने मिळतील हे चमत्कारिक फायदे
Benefits of Chewing Cloves
| Updated on: Aug 03, 2025 | 9:47 PM
Share

लवंग खाल्ल्याने चिभेची चव वाढते.अलिकडे फिटनेस आणि हेल्थच्या प्रति लोक जागरुक होत आहेत. काही घरगुती टीप्स आणि हेल्थ ट्रीक्स खूप फायदा देतात. त्यातील एक लवंग चघळणे एक आहे. जर तुम्ही रोज एक महिना उपाशीपोटी लवंग चघळला तर यातून मिळणारे आरोग्याचे लाभ चमत्कारापेक्षा कमी नाहीत. ही छोटीसी वस्तू तुमच्या शरीराचा कायाकल्प करेल. चला तर याचे चमत्कारीक फायदे आणि आपल्या रुटीनमध्ये याचा समावेश करण्याची पद्धत पाहा काय ?

लवंगाचे औषधी गुण

लवंगात एण्टी -बॅक्टीरिएल, एंटी-इंफ्लेमेटरी आणि एंटी ऑक्सीडेंट गुण असतात. यात युजेनॉल नामक तत्व आढळते. जे यास औषधी रुपाने प्रभावी बनवते. याच्या नियमित सेवनाने शरीरातील अनेक समस्यांपासून सुटका होऊ शकते.

रोज रिकाम्या पोटी लवंग खाण्याचे फायदे

1. पचन यंत्रणा सुधारते

लवंगाच्या सेवनाने पचनतंत्र मजबूत होते. याने गॅस, एसिडीटी आणि अपचन सारख्या समस्या दूर होतात. रिकाम्या पोटी लवंग चघळल्याने पोटातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.

2. इम्यूनिटीत वाढ होते

लवंगातील एंटीऑक्सीडेंट तत्व रोग प्रतिकारक क्षमता मजबूत करतो.आणि शरीराला संक्रमण आणि आजारापासून वाचण्यात मदत करतो

3. तोंडाचे आरोग्य सुधारते

लवंग सेवनाने हिरड्या आणि दातांची समस्या दूर होते. आणि याचा एंटी-बॅक्टीरियल प्रभाव तोंडाची दुर्गंधी आणि कॅव्हीटी रोखण्यास मदत करतो.

4. सांधेदुखीपासून सुटका

लवंगातील एंटी-इंफ्लेमेटरी गुण सांध्यातील सूज आणि दुखणे कमी करण्यास मदत करते. लवंग नियमितरुपाने चघळल्यास संधीवातासारख्या समस्येत आराम मिळतो.

5. त्वचा उजळते

लवंग शरीरातील टॉक्सिन्सना बाहेर काढते, त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते. याच्या एंटीऑक्सीडेंट गुणामुळे वय वाढण्याच्या लक्षणांना कमी करते.

6. ब्लड शुगर कंट्रोल

लवंग सेवनाने ब्लड शुगरला कंट्रोल करण्यात मदत मिळते. हा उपाय डायबिटीज रुग्णांसाठी खूपच फायदेमंद मानला जातो.

लवंग चावण्याची योग्य पद्धत

सकाळी रिकाम्या पोटी एक ते दोन लवंग चघळा, यास चांगल्या प्रकारे चावल्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्या. आणि असे एक महिना नियमितपणे करा आणि याचा परिणाम पाहा

ही काळजी देखील घ्या

जास्त प्रमाणात लवंग चघळू नये, कारण याने शरीरातील उष्णता वाढते

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी आहे, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

गर्भवती महिलांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार लवंग खाव्यात

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा