तुम्हाला दिवसभरात सारखी लागते भूक ? हा आजार तर झाला नाही ना ?
तुम्हालाही जेवल्यानंतर काही वेळाने पुन्हा भूक लागते का ? याचे उत्तर हो असे असेल तर याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना दाखवून घ्या.

नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : जेवल्यामुळे आपलं केवळ पोट भरत नाही तर शरीर आणि मूडही चांगला राहतो. साधारणत: बहुतांश लोक हे सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी हलकी न्याहरी आणि रात्रीचे जेवण (eating food) असा आहार घेतात. पण काही लोक असेही असतात ज्यांना इतकी भूक (hunger) लागते की ते दिवसभरात कितीही वेळा जेवतात. तुम्हालाही जेवल्यानंतर काही वेळाने पुन्हा भूक लागते का आणि काही खावसं वाटतं का ?
जर याचं उत्तर हो असं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, आणि वेळीच डॉक्टरांना भेटून हेल्थ चेकअप करू घ्यावे. कारण जास्त भूक लागणे हे एखाद्या आजाराचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.
जास्त भूक का लागते ?
जर तुम्ही खूप शारीरिक श्रम करत असाल तर तुम्हाला वारंवार भूक लागू शकते. पण काहीही श्रम न करताचा तुम्हाला सतत, लवकर भूक लागत असेल तर तो चिंतेचा विषय आहे. डायबिटीस अर्थात मधुमेह हे देखील सतत भूक लागण्याचे कारण असू शकते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अनेकदा असे दिसून येते की जेवल्यानंतरही त्यांना लवकर भूक लागते. कारण त्यांच्या शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही. मधुमेह हा असाध्य आजार असू शकतो, पण तो योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.
थायरॉईडचा त्रास असेल तरीही तुम्हाला जास्त भूक लागते. थायरॉईडमध्ये भूक तर लागतेच, पण वजनही झपाट्याने वाढू लागते. काही लोकांच्या चेहऱ्यावरही केस दिसू लागतात.
आजकाल बरेचसे लोक डिप्रेशन आणि स्ट्रेसने त्रस्त असतात. स्ट्रेस किंवा डिप्रेशनचा सामना करत असाल भूक जास्त लागण्याची समस्या दिसू शकते. भुकेमुळे अनेक वेळा लोक नकळत गरजेपेक्षा जास्त अन्न खातात, त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागतो आणि वजन वाढण्याचाही धोका असतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
