AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्यासाठी सगळीच फळे चांगली, कोणत्या फळाचे ज्यूस पुरवते दिवसभर एनर्जी?

चहा किंवा कॉफी तुम्हाला थोड्या वेळासाठी ऊर्जावान ठेवते. यानंतर थकवा आणि आळस तुम्हाला पुन्हा घेरतो. आज आम्ही तुमच्यासाठी काही एनर्जी ड्रिंक्स घेऊन आलो आहोत जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने समृद्ध आहेत जे तुम्हाला दिवसभर एनर्जीने परिपूर्ण ठेवतात, तर चला जाणून घेऊया एनर्जी ड्रिंक.

आरोग्यासाठी सगळीच फळे चांगली, कोणत्या फळाचे ज्यूस पुरवते दिवसभर एनर्जी?
Fruit JuicesImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 06, 2023 | 8:03 PM
Share

मुंबई: जेव्हा लोकांना थकवा जाणवतो तेव्हा ते पटकन चहा किंवा कॉफी बनवून पितात. यामुळे त्यांचा थकवा लगेच दूर होऊन त्यांना ताजेपणा जाणवतो. पण चहा किंवा कॉफी तुम्हाला थोड्या वेळासाठी ऊर्जावान ठेवते. यानंतर थकवा आणि आळस तुम्हाला पुन्हा घेरतो. आज आम्ही तुमच्यासाठी काही एनर्जी ड्रिंक्स घेऊन आलो आहोत जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने समृद्ध आहेत जे तुम्हाला दिवसभर एनर्जीने परिपूर्ण ठेवतात, तर चला जाणून घेऊया एनर्जी ड्रिंक.

केळी मिल्क शेक

त्यासाठी दुधात केळी, बदाम, काजू आणि इतर ड्रायफ्रूट्स घालून मिक्सरमध्ये टाकून किसून घ्यावेत. तुम्हाला हवं असेल तर केळीमध्ये ओट्स मिसळूनही स्मूदी बनवू शकता. केळीमध्ये पोटॅशियमसारखी अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. अशावेळी जर तुम्ही सकाळी केळीपासून बनवलेला शेक प्यायला तर तो तुम्हाला दिवसभर एनर्जी देतो.

हर्बल टी

त्यासाठी गरम पाण्यात वेलची, आले आणि हळद घालून मिक्स करावे. हवं तर त्यात सैंधव किंवा काळे मीठही तुम्ही घालू शकता. हा घरगुती हर्बल चहा अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने तुम्हाला खूप ताजेतवाने वाटू लागते.

डाळिंबाचा रस

डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी, के, ई, मॅंगनीज, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम आणि झिंक सारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. याचे सेवन आपल्याला रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास देखील मदत करते. यासाठी डाळिंबाच्या रसात लिंबाचे काही थेंब मिसळून त्याचे सेवन करावे.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.