हिवाळ्यात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी आरोग्याची अशाप्रकारे घ्या काळजी
हिवाळ्यात उच्च रक्तदाबाची समस्या लक्षणीयरीत्या वाढते. त्यामुळे या ऋतूत रक्तदाबाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे आपण आजच्या लेखात तज्ञांकडून जाणून घेऊयात.

आजकाल उच्च रक्तदाबाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कारण बदलत्या जीवनशैलीचा व खाण्यापिण्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. त्यात थंड हवामानामुळे उच्च रक्तदाबाची समस्या आणखी गंभीर होते. हिवाळ्यात तापमान कमी झाले की शरीराच्या नसा आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो. त्यामुळे यांचा परिणाम हृदयावर होऊ लागतो. तर हदयाला पुरेसा रक्त प्रवाह राखण्यासाठी अधिक काम करावे लागते. शिवाय लोकं थंडीत शारीरिक हालचाली कमी करतात, ज्यामुळे वजन वाढण्याचा आणि अनियंत्रित रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हिवाळा अधिक धोकादायक मानला जातो.
हिवाळ्यात रक्तदाब वाढल्याने हृदयाच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीच्या समस्यांचा धोका वाढतो. तसेच या हवामानात रक्ताभिसरण मंदावल्याने छातीत दुखणे, चक्कर येणे, डोके हलके होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा येणे आणि पायांना सूज येणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही लोकांमध्ये, रक्तदाब अचानक वाढल्याने दृष्टी अंधुक होणे, नाकातून रक्त येणे आणि तीव्र डोकेदुखी देखील होऊ शकते. ही सर्व लक्षणं धोक्याची लक्षणे असतात आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. चला तर मग आजच्या लेखात आपण हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते उपाय करावे ते तज्ञांकडून जाणून घेऊयात.
हिवाळ्यात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
तज्ञांच्या मते हिवाळ्यात उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रथम, तुमचे शरीर उबदार ठेवा आणि गरम कपडे न घालता थंड हवेत बाहेर जाणे टाळा. रक्ताभिसरण योग्य राहण्यासाठी दररोज चालणे, योगा किंवा स्ट्रेचिंग यासारख्या हलक्या शारीरिक हालचाली करा. मीठाचे सेवन मर्यादित करा आणि जास्त तळलेले अन्नाचे सेवन करणे टाळा.
या ऋतूत लोकं कमी पाणी पितात, ज्यामुळे डिहायड्रेशन आणि कमी हायड्रेटेड रक्तदाब होऊ शकतो. म्हणून, दिवसभर पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच जी लोकं मद्यपान आणि धूम्रपान करतात त्यांचा थंडीच्या दिवसात रक्तदाब अचानक वाढू शकतो, म्हणून हे टाळा. वेळेवर औषधे घ्या आणि नियमितपणे घरगुती रक्तदाब मॉनिटरने तुमचा रक्तदाब तपासा. ताण कमी करण्यासाठी ध्यान करणे देखील खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात या सवयी स्थिर रक्तदाब राखण्यास मदत करू शकतात.
हे देखील आवश्यक आहे
सकाळी लवकर अति थंडीत बाहेर जाणे टाळा.
कोमट पाण्याने आंघोळ करा.
तुमचे रक्तदाब नियमितपणे तपासा.
व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी सौम्य सूर्यप्रकाश घ्या.
पुरेशी झोप घ्या आणि ताण कमी ठेवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
