AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक महिन्याआधीच दिसतात स्ट्रोकची ही 5 मोठी लक्षणे, वेळीच व्हा सावधान

Brain Stroke Signs: जर तुम्ही स्ट्रोक वा पक्षाघाताची लक्षणे वेळीच ओळखता आला तर तुम्ही उपचार सुरु करुन स्वत:ला वाचवू शकतो. त्यामुळे स्ट्रोक येण्याआधी कोणती ५ लक्षणे दिसतात ते पाहूयात...

एक महिन्याआधीच दिसतात स्ट्रोकची ही 5 मोठी लक्षणे, वेळीच व्हा सावधान
Stroke Early Warning Signs
| Updated on: Nov 20, 2025 | 10:58 PM
Share

जेव्हा मेंदूला ऑक्सीजन नीट प्रकारे पोहचत नाही, तेव्हा स्टोक येतो. स्ट्रोक ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे. त्यावर लागलीच लक्ष देण्याची गरज आहे. जर स्ट्रोक आल्यानंतर तातडीने उपचार झाला नाही, तर काही मिनिटांत लकवा किंवा मृत्यू होऊ शकतो. काही स्ट्रोक अचानक येतात. परंतू बहुतांशी स्ट्रोक हे हळूहळू महिन्यांनी विकसित होत असतात. त्यामुळे ते आधी संभाव्य धोक्याचा इशारा देत असतात. चला तर स्ट्रोकचे 5 इशारे कोणते ज्यामुळे तुम्ही सावध होऊ शकता.

1. गंभीर आणि सततची डोकेदुखी

ही डोकेदुखी सर्वसामान्य डोकेदुखीहून थोडी वेगळी असते. कधी-कधी ही अचानक सुरु होते. तुमच्या जुन्या डोकेदुखीच्या तुलनेत ही डोकेदुखी जास्त प्रदीर्घ आणि तीव्र असते. साधी औषधे यावर परिणाम करत नाही. त्यामुळे असे असामान्य वा नवीन स्वरुपाचे डोके दुखत असेल तर तुरंत डॉक्टरांना भेटा. हे डोकेदुखी मेंदूमार्फत पाठवलेला संदेश असू शकतो. जो स्ट्रोकच्या जोखीमचे संकेत असू शकतो.

2. बोलण्यात अडचण

स्ट्रोकच्या आधी काही रुग्णांना नीट शब्द उच्चारता येत नाही. बोलणे किंवा समजण्यात अडचण निर्माण होते. शब्दाची निवड करण्यात अडचणी आल्याने तुमचे बोलणे समोरच्यांना कळत नाही. काही वेळी साधारण वाक्य समजण्यासाठी अडचणी येतात. याचे कारण मेंदूत त्या भागात ऑक्सीजनची कमतरता होते. हे केंद्र भाषेवर नियंत्रण करते. जर ही समस्या अचानक आणि वारंवार होत असेल तरी याला मेडिकलची इमर्जन्सी माना आणि डॉक्टरांशी संपर्क करावा.

3. अचानक कमजोरी वा सुन्नपणा

सर्वसामान्यपणे चेहरा किंवा हातपायात बधिरपणा किंवा सुन्नपणा जाणवतो. कमजोरी येऊ शकते किंवा येऊन ती पुन्हा जाते. मेंदूत गती आणि संवेदना असलेल्या ठिकाणी रक्त प्रवाह कमी झाल्याने असे होते. अनेकदा ही लक्षणे एकदम हलक्या स्वरुपात असल्याने तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता. परंतू तुम्हाला वारंवार शरीरात बराच काळ सुन्नपणा जाणवत असेल कमजोरी जाणवत असेल तर डॉक्टरांना लागलीच भेटा.

4.दृष्टी संबंधी समस्या

नजरेने नीट न दिसणे हा देखील स्ट्रोकचा इशारा असू शकतो. कारण स्ट्रोक दरम्यान मेंदूतील दृष्टी संबंधीचे केंद्रातील हिंसा प्रभावित झाला तर असे होते. कधी कधी डोळ्यांसमोर चमकता प्रकाश दिसतो. किंवा एक डोळ्याने किंवा दोन्ही डोळ्यांनी लक्ष केंद्रीत करणे कठीण होत असेल आणि ही स्थिती अनेक तास राहिली तर डॉक्टरांची भेट घ्या.

5. चक्कर येणे आणि तोल जाणे

स्ट्रोकच्या आधी मेंदूत तोल सावरण्याच्या केंद्रात रक्त पुरवठा झाला नाही तर तुम्हाला चालताना अडचण येते. पाय हलवणे जमत नाही.शरीर अस्थिर होऊ शकते. हळूहळू ही लक्षणे वाढत जातात. त्यामुळे ही स्थिती खूप वेळ राहिली तर धोका निर्माण होऊ शकतो, लागलीच डॉक्टरांना तुम्ही भेटायला हवे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.