Abortion: गर्भपातानंतर जाणवणाऱ्या ‘या’ समस्या म्हणजे धोक्याची घंटा, लगेच करावा डॉक्टरांशी संपर्क

गर्भपातानंतर काही समस्या जाणवू शकतात या समस्यांकडे कानाडोळा करणे महागात पडू शकते. या कोणत्या समस्या आहेत ते जाणून घेऊया.

Abortion: गर्भपातानंतर जाणवणाऱ्या 'या' समस्या म्हणजे धोक्याची घंटा, लगेच करावा डॉक्टरांशी संपर्क
गर्भपात
Image Credit source: Social Media
नितीश गाडगे

|

Sep 29, 2022 | 10:25 PM

मुंबई,  आजही भारतात, लग्न होताच समाजाकडून मुलीला अपत्य प्राप्तीसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दबाव टाकला जातो. मुलं जन्माला घालणे हे स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा आणि जोखमीचा निर्णय असतो. यासाठी शारीरिकदृष्ट्या ती किती सक्षम आहे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे.  अनेक वेळा तिला स्वतःच्या इच्छेने नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या इच्छेमुळे आई व्हावे लागते. त्याचबरोबर एखाद्या महिलेला काही परिस्थितीत गर्भपात (Abortion) करायचा असेल तर त्यासाठी तिला संपूर्ण कुटुंबाचीही मान्यता घ्यावी लागते. जर एखादी स्त्री लग्नाआधी गरोदर (Pregnant Before Marriage) राहिली तर तिच्या आयुष्यातील ही सर्वात भयानक परिस्थिती असते. तिला गर्भपातासाठी अनेक चोर मार्ग शोधावे लागतात.

अनेक वेळा समाज आणि कुटुंबाच्या भीतीने स्वत:चा गर्भपात करून मुलींचा जीवही धोक्यात येतो. पण गर्भधारणा आणि गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या ऐतिहासिक निकालानंतर महिलांना दिलासा मिळाला आहे. गर्भधारणा आणि गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, महिला विवाहित असो किंवा नसो, तिला गर्भपात करण्याचा सारखाच अधिकार आहे.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर गर्भपातानंतर जाणवणाऱ्या समस्यांची चर्चा होऊ लागली आहे. गर्भपातानंतर जर खालील समस्या जाणवत असतील तर हे धोक्याचे लक्षण आहे. जाणून घेऊया यात कोणकोणत्या समस्यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

  1. अतिप्रमाणात रक्तस्त्राव- सर्व स्त्रियांना गर्भपातानंतर थोडासा रक्तस्त्राव होतो आणि तो चार ते पाच दिवसांपासून दोन आठवड्यांपर्यंत असू शकतो. काहीवेळा मासिक पाळी दरम्यान रक्त प्रवाहाप्रमाणेच रक्तस्त्राव होतो, परंतु जर रक्तस्त्राव खूप होत असेल तर  ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करावा. गर्भपात करताना कोणत्याही प्रकारच्या दुखापतीमुळे किंवा गर्भाचा काही भाग गर्भाशयात राहिल्यानेही रक्तस्त्राव होऊ शकतो. अशा परिस्थितीत ही समस्या अजिबात हलक्यात घेऊ नये.
  2. ताप- जर एखाद्या महिलेला 104 अंश किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल तर ते संसर्गाचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत  ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
  3. मळमळ- गर्भपातानंतर मळमळ किंवा चक्कर येणे सामान्य आहे. सर्जिकल गर्भपातानंतर 24 तासांपर्यंत हे होऊ शकते, तर वैद्यकीय गर्भपातानंतर काही दिवस उलट्या होऊ शकतात, परंतु ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास ते एखाद्या प्रकारच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. या परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  4. तीव्र पाठदुखी- जर गर्भपातानंतर खूप पाठदुखी होत असेल तर ते गर्भाशयात गुठळ्या तयार झाल्यामुळे देखील असू शकते.
  5.  

    तीव्र वासाचा स्त्राव- जर गर्भपातानंतर, रक्तस्त्राव व्यतिरिक्त, योनीतून मोठा स्त्राव होत असेल, तसेच त्याचा तीव्र वास येत असेल, तर अशा परिस्थितीत देखील स्त्रीने डॉक्टरांना कळवावे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें