AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care| तुम्ही व्यायामाला कधी सुरुवात करावी? तुमच्या शरीराचं घड्याळ चेक केलात का?

आपलं शरीर आपल्याला वारंवार संकेत देत असतं. जर आपल्याला कुठला त्रास होत असेल तर आपलं शरीर आपल्याला येणाऱ्या आजाराचं संकेत देत असतं. त्यामुळे शरीराचे संकेत ओळखा आणि वेळीच एक्सरसाइज सुरु करा.

Health care| तुम्ही व्यायामाला कधी सुरुवात करावी? तुमच्या शरीराचं घड्याळ चेक केलात का?
start exercise
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 3:17 PM
Share

बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे आपल्याला अनेक आजारांनी वेढलं आहे. त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन काम (online work) म्हणजे घरी तासतासांत एका जागेवर बसून काम करतोय. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतोय. तुम्हाला माहिती आहे का तुमचं शरीर तुम्हाला येणाऱ्या आजाराचं संकेत देत असतं. त्यामुळे हे संकेत ओळखा आणि एक्सरसाइज (Start exercise)करायला सुरुवात करा. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला एक्सरसाइज करायला वेळ मिळत नाही. पण दिवसातून थोडा तरी वेळ एक्सरसाइजसाठी काढायला पाहिजे. एक्सरसाइजमुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. पाहूयात कुठली लक्षण दिसली की आपण्यास एक्सरसाइज करण्याची गरज आहे.

हायबीपीचा त्रास सतत हायबीपीचा त्रास होत असेल तर आता तुम्हाला एक्सरसाइज करण्याची वेळ आली आहे. एक्सरसाइज केल्याने तुम्हाला हलक वाटेल. एक्सरसाइज केल्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल. त्यामुळे तुमचं बीपी कंट्रोलमध्ये राहिल.

एसिडीटीचा त्रास होणे जर तुम्हाला सतत एसिडीटीचा त्रास होत असेल तर तुम्हाला एक्सरसाइज करण्याची गरज आहे. सतत एसिडीटी होणे म्हणजे तुम्हाला पोटाचे गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. जर अशा वेळी तुम्ही एक्सरसाइज केली तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. अनेक वेळा डॉक्टरसुद्धा एसिडीटीसाठी व्यायाम करण्याचा सल्ला देतात. पण तुम्ही कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.

स्किन मध्ये बदल होणे आपल्या शरीरात होणाऱ्या बदलाकडे कायम लक्ष दिलं पाहिजे. जर तुम्हाला घाम येणं बंद झालं असेल तर हे संकेत आहे की तुम्हाला आता व्यायाम करायची गरज आहे. तुमचं शरीर आता थकलं आहे. शरीरातून घाम बाहेर पडणे गरजेचं आहे म्हणून अशावेळी व्यायाम करुन घाम काढला पाहिजे.

तणाव वाढणं आजकाल कामाचा तणाव वाढला आहे. त्यामुळे सतत डोके दुखी, पाय दुखणं, बॉडी पेन सारखे गोष्टी त्रास देत असतात. या सगळ्यावर व्यायाम हा सगळ्यात चांगला उपाय आहे. व्यायाम केल्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटेल. व्यायाम केल्यामुळे तुमचं शरीर हलक वाटेल आणि तुमची अनेक दुखणं कमी होतील.

पाठ सतत दुखणे गेल्या दोन वर्षात वर्क फ्रॉम होम सुरु आहे. त्यात सतत तासतासांत बसून काम सुरु आहे त्यामुळे पाठदुखीची समस्या वाढली आहे. यावर एक रामबाण उपाय म्हणजे व्यायाम करा. व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीराच्या नसा मोकळ्या होतील त्यामुळे पाठ दुखीची समस्या दूर होणार.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

Video | ‘चहापेक्षा किटली गरम!’ या म्हणीचा अर्थ या व्हिडीओत लपालाय, शिक्षिकेचा संताप पाहून लोकं भडकले

Birthday Special : रामायणाची जादू, प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल दिसताक्षणी लोक पाया पडायचे!

दलित वकिलाला रो हाऊस नाकारणाऱ्या बिल्डरचे लायसन्स रद्द करा, RPI चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.