गरोदरपणात ‘ही’ लक्षणं आढळल्यास सावधान!, बाळावर होऊ शकतो गंभीर परिणाम

गरोदरपणात ‘ही’ लक्षणं आढळल्यास सावधान!, बाळावर होऊ शकतो गंभीर परिणाम
प्रातिनिधीक फोटो

Health Tips गर्भवती असताना हार्मोन्स बदलामुळे अनेकांना खूप त्रास होतो. आपल्या शरिरात काही बदल या दिवसात दिसून येतात. आपण त्यावेळी हा होणाऱ्या त्रास गर्भधारणेमुळे आहे असं समजतो. मात्र अनेक वेळा सगळी लक्षणं ही आपण गर्भवती असल्यामुळे नसतात. तुम्हालाल थायरॉइडचा त्रासही असू शकतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 28, 2022 | 1:27 PM

मुंबई : गर्भवती असताना थायरॉइडचा त्रास आजकाल सामान्य गोष्ट झाली आहे. गर्भवती असताना अनेकांना हा त्रास होतो. गर्भवती असताना हार्मोन्सच्या बदलामुळे स्त्रियांना अनेक समस्या होतात. त्यामुळे या दिवसात दिसणारे प्रत्येक लक्षण गर्भवती असल्यामुळे आहेत असं वाटतं. मात्र तसं नाही, काही लक्षणं ही वेगळ्या समस्यांची पण असू शकतात. तुम्हाला थायरॉइडचा त्रासही असू शकतो. थायरॉइडच्या ग्रंथी (Thyroid Gland) या घशात असतात. या ग्रंथी शरिरातील हार्मोन्सला नियंत्रित करत असतात. गर्भवती असताना शरिरात हार्मोन्स बदल होत असतात त्यात थायरॉइडच्या ग्रंथींकडून नियंत्रित होत असलेल्या हार्मोन्सवरही परिणाम होतो. अशावेळी गर्भवती असताना तुम्हाला थायरॉइडचा त्रास (Thyroid during Pregnancy) होतो. थायरॉइडचे (Thyroid) हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम असे दोन प्रकार आहेत. काय आहेत थायरॉइडचे लक्षणं आणि त्यावर उपचार ते जाणून घेऊयात…

हायपोथायरॉईडीझमची लक्षणं

1. चेहऱ्यावर सूज येणे 2. त्वचेत घट्टपणा जाणवणे 3. जास्त थकवा येणे 4. नाडीची गती कमी होणे 5. जास्त बद्धकोष्ठता 6. थंडीचा अभाव 7. वजन वाढणे 8. शरीरावर पेटके येणे 9. पोटात बिघाड 10. कामात लक्ष न लागणे किंवा स्मृती कमजोर होणे 11. टीएसएचची पातळी वाढणे 12. टी 4 ची पातळी कमी होणे

हायपरथायरॉईडीझमची लक्षणं

1. थकवा 2. उल्टी येणे 3. ह्रदयाची गती वाढणे 4. भूक कमी किंवा अधिक होणे 5. चक्कर येणे, 6. घाम अधिक येणे, 7. नजर कमजोर होणे 8. डायबिटीज असेल तर ब्लड शुगर वाढणे 9. पोट बिघाड होणे 10. वजन कमी होणे.

हायपोथायरॉइचा बाळावर काय परिणाम होतो?

गर्भवतीला हायपोथायरॉइचा त्रास असल्यास गर्भाच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, गर्भातील बाळाच्या विकासाची गती धीमी होते. तसंच हायपोथायरॉइड असणाऱ्या गर्भवती महिलांवर गंभीर परिणाम दिसून येतात. गर्भाच्या मानसिक आणि शारिरीक विकासावर त्याचा परिणाम होतो.

उपचार न केल्यास गर्भवती होणार हे त्रास

1. उच्च रक्तदाब 2. अशक्तपणा 3. गर्भपात 4. वेळेआधी डिलिव्हरी

योग्य वेळी उपचार न केल्यास महिलांना अशा अनेक त्रासांना समोरे जावं लागू शकतं.

काय आहेत उपचार?

गर्भवतीला थायरॉइडचा त्रास असल्यास तिची वेळोवेळी तपासणी केली जाते. अनेक महिलांना एंटीथायरॉइडची औषधं दिली जातात. त्याशिवाय या गोष्टींचं पालन करावं.

1. तज्ञांच्या निर्देशांचे पालन करा 2. औषधे वेळेवर खा 3. डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज व्यायाम करा 4. योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली योग आणि मेडिटेशन करा. 5. रोज थोडा वेळ वॉक करा.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

संबंधित बातम्या

Horse Gram Benefits : कुलथीच्या डाळीचे आरोग्यादायी फायदे तुम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या त्याचे फायदे!

हार्ट अटँक आल्यावर पहिल्या 15 मिनिटात करा या 5 गोष्टी, वाचू शकतात प्राण

सर्दी, खोकला अन् तापही असताना कोरोना टेस्ट केली नाही? नव्या सर्वेक्षणांतून तीन महत्त्वाची कारणं उघड

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें