AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लास्‍कमध्ये भरा ‘हे’ गरमागरम पेय, पिताच कमी होईल गॅसेसचा त्रास; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पोटातील गॅस, बद्धकोष्ठता, अपचन या समस्या दूर करण्यासोबतच वजन कमी करण्यास मदत करतील असे काही घरगुती उपाय शोधत असाल तर एका पेयाच्या सेवनाने तुम्हाला फायदा होऊ शकेल.

फ्लास्‍कमध्ये भरा 'हे' गरमागरम पेय, पिताच कमी होईल गॅसेसचा त्रास; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 27, 2023 | 11:40 AM
Share

नवी दिल्ली – हिवाळ्यात भजी, समोसे असे तळलेले किंवा चटकमटक पण अनारोग्यकारक (unhealthy food) पदार्थ खाण्याची क्रेझ थोडी वाढते. या गोष्टी आपण अगदी मनसोक्त खातो, पण ते खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना काही वेळातच पोटदुखी किंवा अपचनाचा (indigestion) त्रास होऊ लागतो. अनेक लोकांच्या पोटाशी संबंधित तक्रारी वर्षानुवर्षे सुरु असतात. त्यापासून मुक्त होण्यासाठी सतत औषधं घेत राहिलो तर त्याच्या साइड इफेक्ट्सचा धोका देखील वाढतो. अशा परिस्थितीमध्ये काही घरगुती उपायांनी हा त्रास कमी होऊ शकतो. आहार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार हे पेय केवळ पोटातील गॅसेस (gases) आणि अपचनाची समस्याच दूर करत नाही तर मेटाबॉलिज्म सुधारण्यासही मदत होते.

ते पेय कोणते आहे आणि ते कसे तयार करावे हे जाणून घेऊया.

कृती

– एका भांड्यात एक लीटर पाणी उकळावे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप घालावी. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा धने टाकावे. ते मिश्रण एकत्र करून त्यामध्ये थोडसं आलं किसून घालावे व लिंबाचा रस मिसळावा. हे सर्व मिश्रण नीट एकत्र करावे. हे सर्व मिश्रण फ्लास्क किंवा थर्मासमध्ये घालून ठेवावे.

असा करा वापर तुम्ही हे मिश्रण थर्मासमध्ये घालून दिवसभर तुमच्यासोबत ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ते पिऊ शकता. गरमागरम हे पेय प्यायल्याने तुमची पोटाची समस्या दूर होईल आणि तुम्ही औषधांशिवाय निरोगी आणि तंदुरुस्तही राहू शकाल.

याचे अन्य फायदे आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, या पेयाच्या सेवनाने पोटात गॅस निर्माण होणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर या समस्या तर दूर होतातच, त्याशिवाय आपले मेटाबॉलिज्मही वाढण्यास मदत होते. एवढेच नाही तर हे पेय सेवन करून आपण शरीर सहज डिटॉक्स करू शकतो. अशाप्रकारे, वजन कमी करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील हे पेय खूप उपयुक्त ठरू शकते.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती