Health Tips | प्रसूतीनंतर पोट वाढले ? डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्याचे काही खास उपाय

Health Tips | प्रसूतीनंतर पोट वाढले ? डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्याचे काही खास उपाय
Image Credit source: tv9

डिलिव्हरीनंतर वाढलेले वजन घटवणे महिलांना मोठी डोकेदुखी आहे. पोटाचा घेर वाढल्याने आत्मविश्वास कमी झाल्यासारखे वाटते. वजन काटा असाच वाढला तर पुुुढे कााा होईल असे वाटते. आता हे वजन कमी होणारच नाही असेे जर तुुम्हाला वाटत असेल तर या टीप्स नक्की आजमावून पहा आणि बघा वजनात काय फरक पडतो ते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 27, 2022 | 10:59 AM

मुंबई : गरोदर असताना वाढलेले वजन बाळंतपणानंतरही लवकर कमी होत नाही. डिलिव्हरी (Pregnancy) नॉर्मल झाल्यावर महिला ताकद यावी म्हणून तूपाचे लाडू आणि खूप कँलरीज असलेले पदार्थ खातात. अशावेळी वजन नियंत्रित करणे अवघड आहे. डिलिव्हरीसाठी सिझेरियन झाले असेल तर पोट पुढे यायला सुरूवात होते. म्हणजे डिलिव्हरी कशीही असो वजनाचा काटा पुढे गेल्याने महिला चिंतेत असतात. तुम्ही पण असा विचार करत असाल तर हा तुमचा भ्रम आहे. डिलिव्हरीनंतरही तुम्ही तुमचे वजन नियंत्रित करू शकता. अर्थात यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार.

डिलिव्हरीनंतरचे वजन कमी करण्याच्या खास टिप्स-

ओव्याचे पाणी :

ओव्याचे पाणी वजन नियंत्रण आणि पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून पाणी उकळून घ्या. नंतर पाणी गाळून घ्या प्या. यामुळे पोटातील गँस कमी होतात. हे पाणी दिवसभर पिता येते. हे शक्य नसेल तर जेवणानंतर दोन्ही वेळा हे पाणी प्या.

स्तनपान आवश्यक :

फिगर खराब होण्याच्या भीतीपोटी महिला मुलांना स्तनपान करणे टाळतात. पण स्तनपान केवळ मुलांसाठी नव्हे तर आईसाठी आवश्यक आहे. स्तनपानामुळे वजन कमी होण्यास मदत होते असे अभ्यासात नमूद आहे.

जायफळचे दूध :

जायफळचे दूध वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. यासाठी एक कप दुधात एक चतुर्थांश जायफळ पावडर टाकून हलवून दूध कोमट करा. यासोबतच फायबरयुक्त आहार घ्या.

फिरायला जा:

बाळंतपणानंतर 9 महिने अवघड व्यायाम करण्यास मनाई आहे. विशेषतः सिजेरियन झाले असेल तर खास काळजी घ्यावी लागते. पण तुम्ही वॉक करू शकता. कमीत कमी सकाळी आणि रात्री जेवणानंतर काही वेळ चालणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल.

इतर बातम्या :

…अशी प्रतिकारशक्ती निर्माण झाली तर कोरोना काही बिघडवू शकणार नाही… ICMR चा दावा

मासिक पाळीत होणाऱ्या मूड स्वींगचा ‘असा’ करा सामना

Omicron : ओमिक्रॉन होऊन गेला असेल तर घाबरू नका, ICMR चा स्टडी काय सांगतो? वाचा सविस्तर


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें