AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vitamin B12 मिळविण्यासाठी 5 पदार्थ

निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे 2.4 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी 12 ची आवश्यकता असते. जर आपल्याला ही पोषक तत्वे मिळाली नाहीत तर अशक्तपणा, थकवा, भूक न लागणे, उलट्या, अतिसार, वजन कमी होणे, हात-पाय सुन्न होणे अशा समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे शरीर खूप कमकुवत होते.

Vitamin B12 मिळविण्यासाठी 5 पदार्थ
Vitamin b 12 food
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 14, 2023 | 6:13 PM
Share

मुंबई: आपल्या शरीराच्या विकासासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते, जी पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आहार घ्यावा लागतो. या आवश्यक पोषक घटकांपैकी एक म्हणजे व्हिटॅमिन बी 12, ज्याच्या कमतरतेमुळे आपले बरेच नुकसान होऊ शकते. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्टने सांगितले की, निरोगी प्रौढ व्यक्तीला दररोज सुमारे 2.4 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी 12 ची आवश्यकता असते. जर आपल्याला ही पोषक तत्वे मिळाली नाहीत तर अशक्तपणा, थकवा, भूक न लागणे, उलट्या, अतिसार, वजन कमी होणे, हात-पाय सुन्न होणे अशा समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे शरीर खूप कमकुवत होते. चला जाणून घेऊया या व्हिटॅमिनची गरज पूर्ण करण्यासाठी आपण कोणते पदार्थ खावेत.

Vitamin B12 मिळविण्यासाठी 5 पदार्थ

  1. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे अंड्याशिवाय नाश्ता अपूर्ण असतो. प्रथिने, नैसर्गिक चरबी व्यतिरिक्त, व्हिटॅमिन बी 12 देखील भरपूर प्रमाणात यात आढळते. अंड्याच्या पांढऱ्या भागापेक्षा पिवळ बल्क खाल्ल्याने अधिक बी 12 मिळेल.
  2. सॅल्मन हा एक मासा आहे जो ताज्या आणि खाऱ्या दोन्ही पाण्यात आढळतो, व्हिटॅमिन बी 12 व्यतिरिक्त, प्रथिने आणि ओमेगा -12 फॅटी ॲसिड देखील भरपूर प्रमाणात यात उपलब्ध आहेत.
  3. आपल्या सर्वांना माहित आहे की मांसामध्ये भरपूर प्रथिने आणि चरबी असते जी आपल्या शरीराच्या विकासासाठी आवश्यक असते, परंतु आपल्याला माहित आहे का की मांसाहार व्हिटॅमिन बी 12 चा समृद्ध स्त्रोत देखील आहे. हे खाल्ल्याने शरीराला दररोज लागणाऱ्या व्हिटॅमिन बी 12 पेक्षा जास्त व्हिटॅमिन बी 12 मिळते, म्हणून मांस मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.
  4. टूना मासा हा एक समुद्री मासा आहे, त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने यासारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, तसेच व्हिटॅमिन बी 12 चा देखील हा एक चांगला स्रोत आहे. हा एक महागडा मासा आहे जो जपानमध्ये खूप आढळतो.
  5. व्हिटॅमिन बी 12 दूध आणि सर्व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. यासाठी तुम्ही रोजच्या आहारात दुधा व्यतिरिक्त चीज आणि दहीचाही समावेश करू शकता. भारतासारख्या देशात दुधाची कमतरता नाही.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....