AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही’ फूड कॉम्बिनेशन्स केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही धोकादायक!

जेवण हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. मात्र तेच जेवण चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास ते शरीरासाठी विषासमान ठरू शकतं. अशी काही फूड कॉम्बिनेशन्स आहेत, जी खाल्ल्यास केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठीही नुकसानदायक ठरतात.

'ही' फूड कॉम्बिनेशन्स केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही धोकादायक!
'ही' फूड कॉम्बिनेशन्स केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही धोकादायक!Image Credit source: tv9 marathi
Updated on: Sep 23, 2022 | 5:19 PM
Share

नवी दिल्ली: सोशल मीडियावरील (social media) व्हिडिओ पाहून किंवा माहिती वाचून हल्ली लोक अशा अनेक गोष्टी ट्राय करू लागले आहेत, ज्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानही होऊ शकतं. एखादा ट्रेंड फॉलो करण्याच्या प्रक्रियेत विचित्र किंवा चुकीच्या पद्धतीं फॉलो (following trends) करणं धोकादायक ठरू शकतं. आजकाल बरेच लोक असे फूड कॉम्बिनेशन्स (weird food combinations) ट्राय करू लागले आहेत, जे विचित्र असू शकतात. पण लोक ते मोठ्या आवडीने आणि चवीने खातात. लोक मोठ्या आवडीने ते वापरून पाहतात. जेवण हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं. मात्र तेच जेवण चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास ते शरीरासाठी (health) विषासमान ठरू शकतं. अशी काही फूड कॉम्बिनेशन्स आहेत, जी खाल्ल्यास केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठीही (problem for health and skin) नुकसानदायक ठरतात.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, असे पदार्थ ( फूड कॉम्बिनेशन) सेवन केल्यास त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात, त्याशिवाय त्वचा कोरडी होते, खाज सुटणे किंवा लालसर होऊ शकते. आम्ही तुम्हाला अशाच काही फूड कॉम्बिनेशन्सबद्दल सांगणार आहोत, जे खाल्याने त्रास होऊ शकतो. जाणून घ्या त्याविषयी…

ही फूड कॉम्बिनेशन्स चुकूनही ट्राय करू नका

दूध आणि फळं

तुम्हाला जर दूध किंवा दह्यामध्ये फळं घालून खायला आवडत असतील तर आजपासूनच ही सवय बदला. खरंतर फळं ही पचायला हलकी असल्याने लवकर पचतात, मात्र दही किंवा दूध पचायला बराच वेळ लागतो. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ पचवण्यात लागणारे वेळेचे अंतर शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे शरीरात गॅस किंवा अॅसिडिटी देखील निर्माण होऊ शकते. तसेच शरीरातील प्रतिक्रियेमुळे, चेहऱ्यावर पुरळही येऊ शकते. त्यामुळे फळं ही दूध किंवा दह्यासोबत एकत्र करून खाऊ नयेत.

जेवणानंतर कोल्डड्रिंक पिणे

काही लोक एखादा पदार्थ खाताना कोल्डड्रिंक पितात. अन्न पदार्थ खाताना किंवा नंतर कोल्ड ड्रिंक्स पिणे सामान्य असते. परंतु असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नये. जर तुम्ही एखाद्या थंड पदार्थाचे सेवन केले असेल तर त्यानंतर काही काळ तरी कोल्डड्रिंकपासून दूर रहा. अशा कॉम्बिनेशनमुळे पोटदुखी किंवा इतर त्रास होऊ शकतो. अशा खराब फूड कॉम्बिनेशनचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो.

तूप आणि मध

हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी वरदान मानले जातात. मात्र तूप आणि मध एकत्र सेवन केल्यास पचन बिघडू शकते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्यास विषारी बायोप्रॉडक्टसचे उत्पादन होऊ शकते. ज्यामुळे न्यूरोलॉजिकल आणि त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.

(टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

आईचा मार का खाल्ला? अंबादास दानवे यांनी सांगितला खास किस्सा
आईचा मार का खाल्ला? अंबादास दानवे यांनी सांगितला खास किस्सा.
18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट
18 महिन्यांचा संघर्ष, पांढरं कपाळ अन् विषाचा घोट.
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे
उद्धव ठाकरेंकडून दानवेंचं कौतुक अन् विरोधकांना चिमटे.
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी
दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी.
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक
Mahadev Munde Case:माझ्या सिंदूरला न्याय द्या, ज्ञानेश्वरी मुंडे भावूक.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट अन् हसून गप्पा.
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात..
महाजन मनसेत नाराज? अमित ठाकरेंचा फोन; तुम्ही मीडियाकडे का गेलात...
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे
दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या - उपमुख्यमंत्री शिंदे.
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट
पायाला जखमा, 12 दिवस खांद्यावर नांगर अन् मुंबईच्या दिशेन पायपीट.
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले..
नितेश राणेंच्या खात्याची जाहिरात सामनाच्या फ्रंट पेजवर; राऊत म्हणाले...