AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणं काय?, कसे होते निदान? काय आहेत उपचार?

ब्रेन ट्यूमर एक खतरनाक आजार आहे. या रुग्णाची विचार आणि समजण्याची शक्ती क्षीण होते. तसेच लागोपाठ डोकेदुखी सुरु होते. या आजारापासून वेळीच कसा बचाव करायचा याची ही माहिती...

ब्रेन ट्यूमरची सुरुवातीची लक्षणं काय?, कसे होते निदान? काय आहेत उपचार?
| Updated on: May 31, 2025 | 5:48 PM
Share

ब्रेन ट्यूमर एक गंभीर आजार आहे. याने रुग्णाला पुढे जाऊन अधिक धोका वाढतो. कारण ब्रेन सर्जरी करण्याची नौबत येते. या आजाराचे अगदी सुरुवातीलाच निदान झाले तर मेडिकल सायन्सच्या प्रगतीमुळे रुग्णाचे प्राण वाचवले जाऊ शकतात. त्यामुळे या आजाराचे सुरुवातीलाच निदान होणे गरजेचे असते. चला तर तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे काय आहेत. आणि डॉक्टरांचे या आजाराबाबत काय मत आहे.

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय  ?

ब्रेन ट्यूमर आजारात एक प्रकारची गाठ असते. ती मेंदूच्या कोणत्याही भागात असामान्य पद्धतीने पेंशींची अमर्याद वाढ होऊन तयार होते.हा ट्यूमर कॅन्सरयुक्त (मॅलिग्नेंट) देखील असू शकतो. आणि कॅन्सर नसलेला ही (बेनाईन) देखील असू शकतो. परंतू कोणत्याही प्रकारची गाठ असली तरी ती मेंदूच्या कार्याला बाधित करु शकते. अनेकदा ती प्राणावर बेतू शकते. त्यामुळे या आजाराचे सुरुवातीची लक्षणे काय आहेत हे पाहूयात..

ब्रेन ट्यूमर हळूहळू वाढतो आणि सुरुवातीला त्याची लक्षणे अगदी सामान्य असतात, उदाहरणार्थ डोकेदुखी किंवा चक्कर येणे. परंतु ही सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करणे देखील धोकादायक असू शकते असे सर्वोदय रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी विभागाचे डॉ. गंगेश गुंजन यांनी म्हटले आहे.

सतत आणि वाढणारी डोकेदुखी

जर तुम्हाला दररोज एकाच वेळी डोकेदुखी होत असेल, जी औषधांनीही बरी होत नसेल किंवा सकाळी उठताच तीव्र वेदना होत असतील, तर ते ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.

बोलण्यात किंवा ऐकण्यात समस्या

जर ट्यूमर मेंदूच्या बोलणे आणि श्रवणाच्या भागावर असेल तर भाषा बोलणे किंवा ऐकण्याचा त्रास होऊ शकतो. बोलण्यात किंवा शब्द ओळखण्यात देखील अडचण येऊ शकतात.

हाता- पायांमध्ये अशक्तपणा किंवा मुंग्या येणे

शरीराच्या कोणत्याही भागात अशक्तपणा, बधीरपणा किंवा वारंवार मुंग्या येणे हे न्यूरोलॉजिकल समस्येचे लक्षण आहे, जे ब्रेन ट्यूमरशी देखील संबंधित असू शकते.

धूसर दृष्टी किंवा दुहेरी प्रतिमा

दृष्टीवर परिणाम होणे, डोळ्यांसमोर अंधुक दृष्टी किंवा दुहेरी प्रतिमा या मेंदूतील वाढत्या दाबामुळे होऊ शकतात.

चक्कर येणे आणि संतुलन बिघडणे

वारंवार चक्कर येणे, चालताना अडखळणे किंवा संतुलन राखण्यास असमर्थता येणे हे एक सावधानतेचे लक्षण असू शकते.

उलट्या किंवा मळमळ

मळमळ होणे, विशेषतः सकाळी उठल्यानंतर, जे इतर कोणत्याही कारणाशिवाय होत आहे, ते मेंदूतील ट्युमर विकाराचे एक लक्षण असू शकते.

स्मरणशक्ती किंवा विचार करण्यात अडचणी

जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी विसरायला होत असतील, विचार करण्यास आणि समजण्यास त्रास होत असेल, तर हे देखील ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.

डॉक्टरांना कधी भेटावे?

ब्रेन ट्यूमरची लक्षणे हळूहळू वाढतात. हातपायांमध्ये कमकुवतपणा किंवा मुंग्या येणे, बोलण्यात किंवा ऐकण्यात अडचण येणे, कमकुवत स्मरणशक्ती किंवा विचार करण्याची शक्ती, उलट्या किंवा मळमळ किंवा चक्कर येणे आणि शरीराचा तोल जाणे, संतुलन बिघडणे, अंधुक दृष्टी किंवा दुहेरी प्रतिमा, ही सर्व ब्रेन ट्युमर या आजाराची लक्षणे आहेत.

आधुनिक तंत्रांनी ट्यूमर काढता येतो

जर डोकेदुखीसह ही लक्षणे एक ते दोन आठवड्यांपासून दिसत असतील आणि सामान्य उपचारांनंतरही डोकेदुखी बरी होत नसेल, तर रुग्णाने विलंब न करता न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला हवा. एमआरआय किंवा सीटी स्कॅन सारख्या चाचण्यांद्वारे मेंदूची स्थिती डॉक्टर जाणून घेऊ शकतात. आजच्या वैद्यकीय शास्त्रात ब्रेन ट्यूमरवर उपचार शक्य आहेत. शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी सारख्या आधुनिक तंत्रांनी ट्यूमर काढता येतो असे न्यूरोसर्जन डॉ. गंगेश गुंजन यांनी स्पष्ट केले आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.