AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Angioplasty | ‘अँजियोप्लास्टी’ म्हणजे नेमके काय?, उपचारानंतर ‘या’ गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे!

अँजिओप्लास्टी ही एक शस्त्रक्रिया आहे. ज्यात हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या उघडल्या जातात.

Angioplasty | ‘अँजियोप्लास्टी’ म्हणजे नेमके काय?, उपचारानंतर ‘या’ गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Jan 05, 2021 | 12:47 PM
Share

मुंबई : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्यानंतर त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. अहवालानुसार, सकाळच्या कसोटी सत्रानंतर गांगुलींच्या छातीत अचानक दुखू लागले आणि त्यांना चक्कर येऊ लागली. यानंतर कुटुंबियांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. 48 वर्षीय सौरव गांगुलीवर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पुन्हा एकदा सगळे हृदयाशी संबंधित आजारांविषयी सतर्क झाले आहेत. ‘अँजियोप्लास्टी’ म्हणजे नेमके काय?, आणि यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात, हे जाणून घेऊया…(What is Angioplasty surgery Know about the process)

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?

अँजिओप्लास्टी ही एक शस्त्रक्रिया आहे. ज्यात हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या उघडल्या जातात. वैद्यकीय भाषेत या रक्तवाहिन्यांना ‘कोरोनरी आर्टरीज’ म्हणतात. हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या समस्यांनंतर डॉक्टर बर्‍याचदा अँजिओप्लास्टीचा अवलंब करतात.

दीड ते दोन तासांत उपचार आवश्यक

या प्रक्रियेस ‘परक्युटेनिअस ट्रान्स्लुमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी’ देखील म्हणतात. बर्‍याच प्रकरणांनमध्ये डॉक्टर अँजिओप्लास्टीनंतर रक्तवाहिन्यांमध्ये ‘कोरोनरी आर्टरी स्टेंट’ देखील बसवतात. हे स्टेंट रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह पुन्हा सुरळीत करण्याचे कार्य करतात. हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णावर एक ते दोन तासांत अँजिओप्लास्टी होणे आवश्यक आहे.

हेल्थलाईनच्या अहवालानुसार, एका तासाच्या आत रुग्णावर अँजिओप्लास्टी केल्याने, मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. हे उपचार जितके लवकर केले जातील, तितका हार्ट फेल्युअरचा धोका कमी होते. अँजिओप्लास्टीचे तीन प्रकार आहेत. बलून अँजिओप्लास्टी, लेसर अँजिओप्लास्टी आणि एथेरॅक्टॉमी अँजिओप्लास्टी.

बलून अँजिओप्लास्टी

बलून अँजिओप्लास्टी दरम्यान, हात किंवा मांडीजवळ एक छोटीशी चीर करून, कॅथेटर नावाची पातळ नळी ब्लॉक केलेल्या धमनीमध्ये घातली जाते. एक्स-रे किंवा व्हिडीओच्या मदतीने डॉक्टर आत जाणाऱ्या नळ्यांचे निरीक्षण करतात. ब्लॉक झालेल्या धमनीपर्यंत पोहोचल्यानंतर कॅथेटर फुगवला जातो. हा फुगा ब्लॉकेज हटवून, धमनी रूंद करतो आणि रक्त प्रवाह सुरळीत करतो.

लेझर आणि एथेरॅक्टॉमी अँजिओप्लास्टी

लेसर अँजिओप्लास्टीमध्ये देखील कॅथेटर वापरला जातो. परंतु, त्यात बलूनऐवजी लेसरचा वापर केला जातो. यामध्ये लेसरला ब्लॉकेजपर्यंत नेले जाते आणि नंतर ब्लॉक धमनी बाष्पीकरणाने मोकळी करण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा बलून किंवा लेसर अँजिओप्लास्टीद्वारे कोणतेही हार्ड ब्लॉकेज काढला जाऊ शकत नाही, तेव्हा एथेरेक्टॉमी शास्त्रक्रिया वापरली जाते.

अँजिओप्लास्टीचे फायदे

सोसायटी फॉर कार्डियोव्हास्क्यूलर अँजियोग्राफी अँड इंटरव्हेंशनच्या अहवालानुसार, अँजिओप्लास्टीद्वारे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. ब्लॉक रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह परत सुरळीत करण्याचा हा सर्वात वेगवान मार्ग आहे. अँजिओप्लास्टी जितक्या लवकर होते, हृदयाच्या स्नायूला तितकेच कमी नुकसान होते. हृदयविकाराच्या झटक्याने श्वास लागणे किंवा छातीत दुखणे या समस्यांतून देखील आराम मिळतो. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो (What is Angioplasty surgery Know about the process).

अँजिओप्लास्टीचे तोटे

प्रत्येक वैद्यकीय प्रक्रियेमध्ये काही धोका असतो. अँजिओप्लास्टीमध्ये वापरले जाणारे एनेस्थेटिक, डाय किंवा इतर काही पदार्थांपासून रुग्णाला अॅलर्जी असू शकते. याव्यतिरिक्त, ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांमधे रक्तस्त्राव, गाठ किंवा जखम होण्याची समस्या देखील उद्भवू शकते. तर, शस्त्रक्रियेनंतर हृदयाचा ठोका अनियमित होण्याचा धोका देखील असतो.

यामुळे रक्तवाहिन्या, हार्ट व्हॉल्व्हचे नुकसान देखील होऊ शकते. हृदयविकाराचा धोका कमी होण्याऐवजी वाढू शकतो. तसेच या प्रक्रियेमुळे मूत्रपिंड देखील खराब होऊ शकते. विशेषत: ज्या लोकांना आधीच मूत्रपिंडाचा आजार आहे, अशा लोकांच्या बाबतीत अधिक काळजी घेतली पाहिजे. शरीरात संसर्ग होण्याचा धोका देखील असतो.

अँजिओप्लास्टीनंतर आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा

अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्यानंतर डॉक्टर रुग्णाला पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेतली गेली पाहिजेत. जर तुम्हाला धूम्रपान करण्याचे व्यसन असेल तर, ते पूर्णपणे सोडले पाहिजे. चांगला आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.

(What is Angioplasty surgery Know about the process)

हेही वाचा :

Follow Us
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय
मोठी खळबळ! अरे असा पराभव.... ओमराजेंची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल; राजकीय वर्तुळात मोठं घडणार?
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं
ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न, तातडीने उचलली मोठी पावलं, थेट वरळीतच....
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा
राज्यभर धो धो धो बरसतोय पाऊस! मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीला मोठा फटका; तब्बल 18...
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!