AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिकारी म्हणता म्हणता पाकिस्तानचा थक्क करणारा निर्णय, पेट्रोल-डिझेलबाबत मोठी घोषणा; भारतात काय स्थिती?

अमेरिका-इराण युद्धामुळे आता भारताला झळ बसू लागली आहे. पाकिस्तान देशदेखील यात होपळला आहे. परंतु आता पाकिस्तानने पेट्रोल, डिझेलच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे.

भिकारी म्हणता म्हणता पाकिस्तानचा थक्क करणारा निर्णय, पेट्रोल-डिझेलबाबत मोठी घोषणा; भारतात काय स्थिती?
pakistan petrol and diesel priceImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2026 | 5:54 PM
Share

Petrol Diesel Price : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. भारतात तर घरगुती गॅस सिलिंडरपासून ते पेट्रोल, डिझेलची किंमत वाढली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर देश अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नागरिकांनी काटकसरीने वागावे असे आवाहन केले आहे. दरम्यान, एकीकडे भारतात काटकसरीने वागण्याचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे पाकिस्तानने मात्र मोठा निर्णय घेतला आहे. भारतात पेट्रोल, डिझेलची किंमत वाढली आहे. परंतु पाकिस्तानने मात्र या दोन्ही इंधनांची किंमत थेट कमी करून टाकली आहे.

पाकिस्तानात पेट्रोल, डिझेलचा भाव किती?

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी केली आहे. सरकारने या दोन्ही इंधनांचा भाव 5 रुपयांनी कमी केला आहे. या निर्णयानंतर आता पाकिस्तानात पेट्रोलचा भाव 409.78 पाकिस्तानी रुपये प्रति लिटर आणि हाय-स्पीड डिझेलचा भाव 409.58 पाकिस्तानी रुपये प्रती लिटर झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजीपासून इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाले. तेव्हापासून पाकिस्तानात इंधनाचा भाव कधी कमी होतोय तर कधी वाढतोय. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानने पेट्रोलचा भाव 14.92 पाकिस्तानी रुपयांनी तर हाय-स्पीड डिझेलचा भाव 15 रुपये पाकिस्तानी रुपयांनी वाढवला होता. 6 मार्च रोजीदेखील पाकिस्तानने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 55 रुपयांनी (पाकिस्तानी) वाढ केली होती.

भारतात नेमकी काय स्थिती?

पाकिस्तानने सध्या पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी केला असला तरीही भारतात मात्र स्थिती वेगळी आहे. भारतात चार वर्षांनी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ केली आहे. 2022 सालापासून पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. याआधी मार्च 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पेट्रोल आणि डिझेलची किंमत प्रत्येकी 2 रुपयांनी कमी करण्यात आली होती.

दरम्यान, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा नव्याने कधी सुरू होणार आणि इंधनाचा पुरवठा कधी सुरळीत होणार याकडे भारत, पाकिस्तानसह समस्त जगाचे लक्ष लागले आहे. भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच... पहा व्हिडीओ
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर...नेमकं काय घडलं?
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवार
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत...
एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक!
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी...
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट