AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजही संकट कायम! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..

1 जुलैपासून राज्यात धुव्वाधार पाऊस कोसळला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम असणार आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.

आजही संकट कायम! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, पुढील 24 तासात..
Heavy Rain
| Updated on: Jul 09, 2026 | 8:18 AM
Share

गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने थैमान घातले. पूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस पडतो, तेवढा 6 दिवसांमध्येच कोसळला. अनेक भागात पाणी साचले. दरड कोसळल्या. काही भागात 5 दिवस पूर्ण होऊनही पाणी अजूनही साचलेले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ज्याचा लोकल सेवेवर थेट परिणाम झाला. राज्यात पावसाने 1 जुलैपासून धुमाकूळ घातला. आज कुठे पाऊस उघडला आहे. सूर्याचे दर्शनही होत नव्हते. यंदा 2 जून रोजी केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर तब्बल काही दिवस हा मॉन्सून अरबी समुद्रातच रेंगाळत होता. जून महिना संपत आला तरीही मॉन्सूनचा पाऊस राज्यात दाखल झाला नव्हता. शेवटी जोरदार पावसाला सुरूवात झाली. 1 जुलैपासून राज्यात धुव्वाधार पाऊस झाला. आजही अनेक भागात भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. काल पुण्यातील काही भागात पाऊस झाला. मुंबईतही रात्री पाऊस सुरू होता. अखेर सकाळी मुंबईत पावसाने विश्रांती घेतली. कोकणात पावसाचा जोर कमी झाला. सातारा आणि पुणे घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाचा आज अंदाज वर्तवण्यात आला. कोकणात पावसाचा आज येलो अलर्ट जारी करण्यात आला.

मॉन्सून संपूर्ण देशात दाखल झाला असून पोषक वातावरण मिळत आहे. गुजरात आणि केरळच्या किनाऱ्या लगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, जळगाव, धुळे, नाशिक घाटमाथा या भागात आज पाऊस हजेरी लावेल. विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात विजांसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर, मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये गाळ साचला. नदीच्या तीव्र प्रवाहात केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा 48 तासांपासून ठप्प. कल्याण-डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिम भागातील हजारो कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा फटका. बेतुरकर पाड्यात महिला बादल्या, टब आणि ड्रममध्ये पावसाचे पाणी साठवून गरज भागवत आहेत. काही नागरिक पावसाचे पाणी गाळून व उकळून पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली. पावसाने ठाणे जिल्ह्यातही जोरदार हजेरी लावली.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे