AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Burnout Syndrome: काय आहे बर्नआऊट सिंड्रोम? तुमच्या प्रोफेशनल जीवनावर होतो परिणाम; जाणून घ्या 10 मोठे संकेत

वाढत्या जबाबदाऱ्या आणि बदलणारी परिस्थिती यामुळे अनेक वेळा काही व्यक्ती बर्नआऊट सिंड्रोमचे बळी ठरतात, मात्र त्यांना त्याची जाणीवही होत नाही. काही संकेत असे असतात, ज्यावरून तुम्हालाही हा सिंड्रोम झाल्याचे लक्षात येऊ शकते.

Burnout Syndrome: काय आहे बर्नआऊट सिंड्रोम? तुमच्या प्रोफेशनल जीवनावर होतो परिणाम; जाणून घ्या 10 मोठे संकेत
काय आहे बर्नआऊट सिंड्रोम? तुमच्या प्रोफेशनल जीवनावर होतो परिणामImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2022 | 2:59 PM
Share

नवी दिल्ली: प्रत्येक व्यक्ती त्यांचं आयुष्य (Life) वेगवेगळ्या पद्धतीने जगते. काहींचा जीवनाचा अनुभव चांगला असतो तर काहींचा वाईट. आयुष्यात आपल्या भल्या-बुऱ्या अशा प्रत्येक परिस्थितीचा सामना करावा लागतो. काही वेळा आपल्यासमोर अशी परिस्थिती उद्भवते ज्यामुळे आपल्याला ताण (stress) येतो. आयुष्य जगण्यासाठी माणसासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिकदृष्ट्या कणखर असणं. पण आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीच्या काळात तणाव आणि जबाबदाऱ्यांचे (responsibilities) दडपण टाळणं अशक्य झाले आहे.

वाढत्या जबाबदाऱ्या आणि बदलणारी परिस्थिती यामुळे अनेक वेळा काही व्यक्ती बर्नआऊट सिंड्रोमचे (Burnout Syndrome) बळी ठरतात, मात्र त्यांना त्याची जाणीवही होत नाही. वेबएमडीच्या बातमीनुसार, काही असे संकेत मिळतात, ज्यावरून तुम्हालाही हा सिंड्रोम झाल्याचे लक्षात येऊ शकते. जाणून घेऊया त्याची लक्षणे…

थकल्यासारखे वाटणे

बर्नआउट सिंड्रोम हा एक प्रकारचा कामाचा ताण आहे. या सिंड्रोमचे एक प्रमुख लक्षण म्हणजे आपल्याला कमी वेळात थकवा जाणवू लागतो. जर तुम्ही ऑफिसमध्ये ८ तास काम केले असेल तर तुम्हाला तो वेळ 80 तासांसारखा वाटू लागतो. तुम्हाला कामावर जाण्यासाठी जर जबरदस्तीने अंथरुणातून बाहेर पडावे लागत असेल तर हे समजून जा की तुम्ही बर्नआउट सिंड्रोमचे बळी आहात.

कामातील रस कमी होणे

बर्नआऊट सिंड्रोमचे दुसरे मोठे लक्षण म्हणजे तुम्ही जे काम करता, त्यातील रस कमी होणे. हे तुमच्यासाठी नकारात्मक आणि कठोर देखील ठरू शकते. कामात रस नसल्यामुळे अनेकदा आपल्याला थकवा येतो.

स्वत:ला निरुपयोगी समजणे

आपण (कामात) पूर्वीसारखे प्रभावी नाही, अशी भावना जेव्हा वाटते तेव्हा ते बर्नआउट सिंड्रोमचे चिन्ह असते. आपले कर्तृत्व कमी होत आहे, त्याचबरोबर कामगिरीही खालावत आहे, अशा भावनांमुळे कामातील रस कमी होतो.

उदास वाटणे

सतत उदास राहणे, हेही बर्नआऊट सिंड्रोमचेच लक्षण आहे. तुम्ही स्वत:ला निरुपयोगी समजत असाल तर अशी स्थिती निर्माण होऊ शकते. एका संशोधनात असे दिसून आले आहे की नैराश्य ही (Depression) आयुष्यभराची भावना आहे, तर बर्नआउट सिंड्रोम हा प्रामुख्याने आपल्या कामाशी संबंधित असतो.

सहकाऱ्यांशी चिडून वागणे

तुमच्या ऑफीसमध्ये समान विचारांची एखादी व्यक्ती नसेल आणि त्या वातावरणात जर तुम्हाला गुदमरल्यासारखे वाटत असेल, तर तुमचा कामाशी संबंधित तणाव वाढतो. ऑफिसच्या बाहेर, घरातही मानसिक आणि भावनिक आधार मिळाला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होते. जर तुम्ही नेहमीच सहकाऱ्यांशी चिडून वागत असाल तर तुम्ही बर्नआउट सिंड्रोमचे बळी ठरू शकता.

मन विचलित होणे

जर तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण वाटत असेल तर तुम्ही बर्नआऊट सिंड्रोमचे बळी ठरत आहात. त्यासोबतच, अशा परिस्थितीत तुम्हाला एखादे काम विसरण्याचा त्रास होऊ शकतो किंवा भ्रमनिरास झाल्यासारखे वाटू शकते.

झोप न येणे

जर तुम्हाला झोप येण्यास खूप त्रास होत असेल किंवा खूप प्रयत्नांनी झोप लागत असेल, तर हे बर्नआऊट सिंड्रोमचे लक्षण ठरते. पुरेशी झोप न झाल्यास हृदय रोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे रोग होण्याचा धोका वाढतो.

ड्रग्ज घेणे आणि मद्यपान करणे

तुम्ही जर तणावग्रस्त जीवनापासून आराम मिळविण्यासाठी ड्रग्ज घेणे किंवा मद्यपान करण्यास सुरुवात केली तर तेही बर्नआऊट सिंड्रोमचे लक्षण ठरते.

नोकरीचा तिरस्कार करणे

अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की आपल्या नोकरीबाबत किंवा कामाबाबत असमाधानी असणे हे बर्नआउट सिंड्रोमचे सर्वात मोठे लक्षण आहे. जर तुम्ही तुमच्या कामावर खुश नसाल आणि ते काम सोडण्याचा पर्याय शोधत असाल, तर तुम्हीही बर्नआऊट सिंड्रोमचे बळी ठरू शकता.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.