AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dementia Prevention: रोज सकाळी उठून ‘ हे ‘ काम केल्यास डिमेंशियाचा धोका कमी; तुम्ही रहाल फिट !

व्यायामाव्यतिरिक्त नियमितपणे घरातील कामं करणे, कुटुंबिय, मित्रमंडळींना भेटणे आणि सामाजिक कार्यात सहभागी होणे, या उपायांनीही डिमेंशिया नियंत्रणात राहू शकतो. दररोज व्यायाम केल्याने डिमेंशियाचा धोका 35 टक्क्यांनी कमी होतो.

Dementia Prevention: रोज सकाळी उठून ' हे ' काम केल्यास डिमेंशियाचा धोका कमी; तुम्ही रहाल फिट !
रोज सकाळी उठून ' हे ' काम केल्यास डिमेंशियाचा धोका कमीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2022 | 1:24 PM
Share

नवी दिल्ली: रोजच्या दिनचर्येत व्यायामाचा (exercise) समावेश केल्याने केवळ शरीर फिट आणि तंदुरुस्त राखण्यात मदत मिळत नाही तर त्यामुळे डिमेंशियाचा (Dementia) धोकाही कमी होतो. डिमेंशिया हा विस्मृतीचा आजार आहे, ज्यामध्ये व्यक्ती एकेक गोष्टी विसरत जाते. वाढत्या वयासह (age) आपल्या नसा कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे डिमेंशियाचा धोका वाढतो. व्यायामाव्यतिरिक्त नियमितपणे घरातील कामं करणे, कुटुंबिय, मित्रमंडळींना भेटणे आणि सामाजिक कार्यात सहभागी होणे, या उपायांनीही डिमेंशिया नियंत्रणात राहू शकतो. दररोज व्यायाम केल्याने डिमेंशियाचा धोका 35 टक्क्यांनी कमी होतो. रोजच्या शारीरिक हालचालींमुळे मेंदूचा मेटाबॉलिज्म वाढते, ज्यामुळे स्मरणशक्ती मजबूत राहण्यास मदत होते. जाणून घेऊया डिमेंशियाचा धोका कमी करण्यासाठी कोणता व्यायाम फायदेशीर ठरू शकतो.

सायकल चालवणे

हेल्थलाइनच्या मते, डिमेंशियाचा धोका कमी करण्यासाठी व्यायाम हा महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. ॲक्टिव्ह राहण्यासाठी सायकलिंग करणे हा एक चांगला व्यायाम आहे. दररोज १२ ते १५ किलोमीटर सायकलिंग करणे हा एक चांगला व्यायाम ठरतो, ज्यामुळे मेंदूही सक्रिय होतो.

चालणे आणि जॉगिंग करणे

दररोज चालायला जाणे आणि जॉगिंग करणे हा देखील एक चांगला व्यायाम मानला जातो. दररोज चालल्याने किंवा जॉगिंग केल्याने शरीर तंदुरुस्त राहते तसेच तणावाची पातळीही कमी होते. यामुळे आपल्या मेंदूला आराम मिळू शकतो. दररोज योगासने करणे हेही डिमेंशिया कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.

झोपेचे निश्चित वेळापत्रक ठरवणे

झोप ही आपल्या शरीरासाठी व मेंदूसाठी अत्यंत आवश्यक असते. पुरेशी झोप घेतल्याने शरीर व मेंदू ताजेतवाने होतात. त्यामुळे रोज रात्री झोपण्याचे आणि सकाळी उठण्याचे एक निश्चित वेळापत्रक तयार करावे. पुरेशी आणि चांगली झोप घेण्याची सवय लावावी. झोपायला जाण्यापूर्वी अर्धा तास आधी कोणीतीही स्क्रीन ( टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप) बघणं बंद करा. स्क्रीन टाइमऐवजी झोपण्यापूर्वी त्या वेळेत एखादे पुस्तक वाचणे, संगीत ऐकणे आणि मेडिटेशन करणे, अशा गोष्टी करता येऊ शकतात. त्यामुळे चांगली व शांत झोप लागते.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....