Monkeypox Virus | 70 देशांत फैलाव तरीही मंकीपॉक्स महामारी असल्याची घोषणा नाही, WHO चे 3 मुद्दे महत्त्वाचे कोणते?

डॉ. अंशुमन म्हणतात, मंकीपॉक्समुळे मृत्यू होत नव्हते. मात्र यंदा प्रथमच पाच संक्रमितांचा मृत्यू झालाय. याचं कारण म्हणजे यावेळी आधी कोरोनाची साथ येऊन गेली आहे.

Monkeypox Virus | 70 देशांत फैलाव तरीही मंकीपॉक्स महामारी असल्याची घोषणा नाही, WHO चे 3 मुद्दे महत्त्वाचे कोणते?
संग्रहित छायाचित्रImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 6:00 AM

नवी दिल्लीः जगभरातील मंकीपॉक्सच्या (Monkeypox) रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) एका आकडेवारीनुसार, आतापर्यंत 75 देशांत मंकीपॉक्सचे 18 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. 1958 मध्ये पहिल्यांदा या विषाणूची लक्षणे समोर आणली गेली. तेव्हापासून आतापर्यंत प्रथमच मंकीपॉक्सचे रुग्ण एवढ्या वेगाने वाढत आहगेत. WHO ने नुकतेच हा आजार म्हणजे पब्लिक हेल्थ इमर्जन्सी (Public health Emergency) अर्थात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. मात्र जगभरातील रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही मंकीपॉक्स ही जागतिक महामारी असल्याचं घोषित का केलं जात नाहीये? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काही मुद्दे महत्त्वाचे आहेत.-

महामारीचे निकष काय आहेत?

आरोग्य नीती आणि महामारी तज्ज्ञ डॉ. अंशुमन कुमार म्हणतात, कोणत्याही आजाराला माहामारी घोषित करण्याचे काही निकष असतात. जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत या आजाराचा संसर्ग किती जणांना झाला, मृतांचा आकडा काय आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेकडून पाहिलं जातं. मंकीपॉक्सचे तीन महिन्यात 18 हजार रुग्ण समोर आले. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हा एक टक्काही नाही. तसेच या आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही फार नाही. तसेच रुग्ण अत्यवस्थ होण्याचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळेच मंकीपॉक्सला महामारी घोषित केलं जात नाहीये.

मंकीपॉक्समुळे मृत्यू कमी…

डॉ. अंशुमन म्हणतात, मंकीपॉक्समुळे मृत्यू होत नव्हते. मात्र यंदा प्रथमच पाच संक्रमितांचा मृत्यू झालाय. याचं कारण म्हणजे यावेळी आधी कोरोनाची साथ येऊन गेली आहे. कोविडमुळे लोकांच्या फुप्फुसांवर परिणाम झालाय. अनेकांना संसर्गजन्य रुग्णांना सीओपीडीची तक्रार होती. मंकीपॉक्स झाल्यानंतर रुग्णांना न्युमोनिया झाला. कोविडमुळे फुप्फुसे कमकुवत होती. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला. मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला असे नाही. पण यामुळे जुनाट आजार उफाळून येऊ शकतात. त्यामुळेच WHO ने मंकीपॉक्सला महामारी म्हणून घोषित केलेलं नाही. पण ज्या वेगाने हा विषाणू पसरतोय, त्यासाठी अलर्ट होणं गरजेचं आहे.

तीन मार्गांनी पसरतो व्हायरस…

डॉ. कुमार सांगतात, हा व्हायरस तीन मार्गांनी पसरतो. पहिला म्हणजे प्राण्यांकडून माणसांकडे संक्रमण होते. संक्रमित प्राण्याच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याता या विषाणूची बाधा होते. दुसरी मार्ग म्हणजे व्यक्तीचा स्कीन टू स्कीन टच. संक्रमित रुग्णाचे कपडे, भांडे किंवा बेडशीटच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो. तिसरे म्हणजे शरीरसंबंधांच्या माध्यमातून… असुरक्षित शरीरसंबंधांमुळेही विषाणू पसरतोय. अमेरिकेसहित अनेक देशांमध्ये समलैंगिक पुरुषांच्या केसेस जास्त समोर येत आहेत. या आजाराचे विषाणू हवेतून पसरत नाहीत.

रोखणार कसे?

डॉ. कुमार यांच्या मते, रेट्रोग्रेड ट्रेसिंगद्वारे या विषाणूची चाचणी होते. आजाराचा फैलाव रोखण्यासाठी संक्रमित रुग्णाची हिस्ट्री पहावी लागेल. तो कोणत्या भागात गेला, त्याचे लोकेशन ट्रेस करावे लागतील. रुग्ण कुणाच्या संपर्कात आला होता. त्याची शरीरसंबंधाची हिस्ट्रीदेखील पहावी लागेल. या काही उपायांद्वारेच आजाराचा फैलाव रोखला जाऊ शकतो. मंकीपॉक्स जीवावर बेतणार नाही, मात्र कोणत्याही आजाराचा शरीरावरील कब्जा हा इतर अवयवांसाठी घातक ठरू शकतो.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.