नायजेरियात पुन्हा नरसंहार, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पादरीचे अपहरण, 11 जणांची हत्या

नायजेरीया देशात ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला 11 जणांची हत्या करुन एका पादरीचे अपहरण करण्यात आले आहे. (nigeria boko haram)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:03 AM, 26 Dec 2020
नायजेरियात पुन्हा नरसंहार, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पादरीचे अपहरण, 11 जणांची हत्या

अबुजा : नायजेरिया देशात ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला 11 जणांची हत्या करुन एका पादरीचे अपहरण करण्यात आले आहे. ख्रिसमच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्यामुळे येथे मोठी खळबळ उडाली आहे. पेमी गावात हा नरसंहार झाला. बोको हराम या दहशतवादी संघटनेने हे कृत्य केले असून पेमी गावात ते ट्रक आणि दुचाकीवरुन आले होते. (11 people killed in nigeria by terror organization boko haram)

नायजेरिया येथील चिबोक गावात 2014 मध्ये तब्बल 400 मुलींचे अपहरण करण्यात आले होते. या गावापासून पेमी हे गाव काही मैलावर आहे. पेमी गावात हा नरसंहार झाला आहे. ख्रिसमच्या निमित्ताने येणाऱ्या सुट्ट्यांच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होऊ शकते असा इशारा येथील सुरक्षा संस्थांनी दिला होता. त्यानंतर हा नरसंहार झाला.

शुक्रवारी 300 मुलांचे अपहरण

बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये वाढ झालीये. या संघटनेने यापूर्वीही अनेकांची हत्या केलेली आहे. मिलितियाचे नेते अबवाकून कबू यांनी सांगितल्यानुसार, बोको हरामच्या दहशतवाद्यांनी मागील शुक्रवारी एका ईसाई गावावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले. तर नायजेरियातील उत्तर पश्चिम भागातील कात्सिना राज्यातील एका शाळेतून 300 पेक्षा जास्त मुलांचे अपहरण केले होते.

मागील दशकभरापासून बोको हराम या संघटनेच्या दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सामान्य नागरिकांचे अपहररण करणे, सेन्य दलांवर हल्ला करणे अशा घटनाही या ठिकाणी वाढल्या आहेत. त्यानंतर आता ख्रिसमाच्या पूर्वसंध्येला हा हल्ला झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानात भ्रष्टाचाराची बजबजपुरी; सीपीईसी प्रकल्प रखडला; चीनची डोकेदुखी वाढली

शेतकरी आंदोलनावर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोला, भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदारांचे पोम्पिओंना पत्र

दाऊद इब्राहिमच्या 38 वर्षीय पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू

(11 people killed in nigeria by terror organization boko haram)