इस्राईलला भारताने याबाबतीत मागे टाकले, अमेरिकेत बनले 12 भारतीय अब्जाधीश
फोर्ब्सच्या २०२५ च्या अहवालानुसार आता अमेरिकेत भारत सर्वाधिक अब्जाधीश देणारा देश बनला आहे. त्यामुळे इस्राईल आता मागे पडला आहे. या यादी एकूण १२५ अब्जाधीश आहेत त्यातील १२ भारतीय मूळ असलेले आहेत.

भारतीय आता केवळ तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रच गाजवत आहेत असे नाही तर अब्जोपतींच्या यादीतही अमेरिकेला मागे टाकत आहेत. अमेरिकेत भारतातून गेलेले स्थलांतरीत आता अब्जावधींच्या फोर्ब्सच्या यादीत झळकले आहेत. यंदा भारताने इस्राईलला मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. या यादीत एकूण १२५ प्रवासी अब्जाधीश असून त्यात सर्वाधिक १२ मूळचे भारतीय आहेत.
हे भारतीय बनले अब्जावधी
फोर्ब्सच्या 2025 च्या अहवालानुसार नवीन भारतीय चेहऱ्यात गुगल पॅरंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्य नडेला आणि पालो ऑल्टो नेटवर्क्सचे सीईओ निकेश अरोडा यांचा समावेश आहे. परंतू सर्वाधिक चर्चेत आहेत ते ६५ वर्षीय जय चौधरी, त्यांनी अमेरिकेत जाऊन सायबर सिक्युरिटी कंपनी Zscaler ची स्थापना केली आणि त्यांची आज एकूण संपत्ती १७.९ अब्ज डॉलर आहे.
हिमालय ते अमेरिकेचा प्रवास
हिमालयातील एक छोट्याशा गावातून अमेरिकेला पोहचलेले जय चौधरी यांनी कधी विमानही पाहीले नव्हते. १९८० मध्ये ते युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटी शिक्षणासाठी गेले आणि त्यांनी कधी मागे वळून पाहीलेच नाही. त्यांनी Zscaler कंपनीच्या आधी चार टेक कंपन्यांची स्थापना केली होती त्या नंतर विकल्या गेल्या. आज त्यांची कंपनी Nasdaq मध्ये सुचीबद्ध आहे. या कंपनीचा ४० टक्के हिस्सा त्यांच्या नावावर आहे.
यादीत आहेत हे भारतीय –
फोर्ब्सच्या यादी भारतातील एकूण १२ अब्जाधीश स्थलांतरीतांचा समावेश आहे. यात जय चौधरी यांच्यासह विनोद खोसला, राकेश गंगवाल, रमेश वाधवानी, राजीव जैन, राम श्रीराम, राज सरदाना, डेव्हीड पॉल, निकेश अरोरा, सुंदर पिचाई, सत्य नडेला आणि नीरजा सेठी सारखी नावे आहेत. हे सर्व विविध क्षेत्रातील तंत्रज्ञ, सॉफ्टवेअर, फायनान्स आणि हेल्थकेअरमध्ये पुढे आहेत.
| अनुक्रम | नाव | संपत्ती (अब्ज डॉलर) | क्षेत्र/कंपनी |
|---|---|---|---|
| 1 | जय चौधरी | 17.9 | सिक्युरिटी सॉफ्टवेयर (Zscaler) |
| 2 | विनोद खोसला | 9.2 | सन मायक्रोसिस्टम्स, वेंचर कॅपिटल |
| 3 | राकेश गंगवाल | 6.6 | एअरलाईन |
| 4 | रमेश टी. वाधवानी | 5.0 | सॉफ्टवेयर |
| 5 | राजीव जैन | 4.8 | फायनान्स |
| 6 | कवितार्क राम श्रीराम | 3.0 | गूगल, वेंचर कॅपिटल |
| 7 | राज सरदाना | 2.0 | टेक्नॉलॉजी सर्व्हीसेस |
| 8 | डेव्हीड पॉल | 1.5 | मेडिकल डिवायसेस |
| 9 | निकेश अरोरा | 1.4 | सायबरसिक्युरिटी, सॉफ्टबँक, गूगल |
| 10 | सुंदर पिचाई | 1.1 | अल्फाबेट |
| 11 | सत्य नडेला | 1.1 | मायक्रोसॉफ्ट |
| 12 | नीरजा सेठी | 1.0 | आयटी कन्सल्टींग |
अमेरिकेतील टॉप ३ श्रीमंत स्थलांतरीत भारतीय
अमेरिकेतील सर्वात श्रीमंत परदेशी नागरिकांत टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क ( संपत्ती ३९३.१ अब्ज डॉलर ) दुसऱ्या क्रमांकावर गुगलचे सह- संस्थापक सर्गेई ब्रिन आणि तिसऱ्या क्रमांकावर एनविडियाचे सीईओ जेनसन हुआंग आहेत. खास बाब म्हणजे फोर्ब्सच्या नुसार ९३ टक्के परदेशी अब्जाधीश सेल्फ मेड आहेत. आणि यातील दोन तृतीयांश तांत्रिक आणि फायनान्स क्षेत्रात आपले साम्राज्य उभे केले आहे.
