प्राजक्ता कोळी युट्युबद्वारे दर महिन्याला किती कमवते ? मोठ- मोठे दिग्गज तिच्यापुढे फेल
प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळी हीने चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.सध्या ती युट्यूबद्वारे बक्कळ पैसा कमवत आहे.मोठ मोठ्या सेलिब्रिटींना जे जमले नाही ते प्राजक्ता कोळी हीने साध्य केले आहे.

युट्युबर ते अभिनेत्री असा प्रवास करणारी मराठमोळी प्राजक्ता कोळी हिला टाईम मॅगझीनने मोस्ट इंफ्लूएंशियल डिजिटल कंटेंट क्रिएटर्सच्या पहिल्या 100 क्रिएटर्स लिस्टमध्ये सामील केले आहे. अभिनेत्री, लेखिका, कंटेन्ट क्रिएटर आणि एक्टीव्हीस्ट प्राजक्ता कोळी या यादीत सामील होणारी एकमेव भारतीय आहे. चला तर पाहूयात प्राजक्ता युट्युबमधून महिन्याला किती कमावते ?
प्राजक्ता प्रसिद्ध यूट्यूबर आहे
प्राजक्ता कोळी हिने प्रसिद्ध रेडिओ स्टेशनमध्ये इंटर्न म्हणून करीयरची सुरुवात केली होती, परंतू २०१५ मध्ये तिने स्वत:चे YouTube चॅनल ‘mostlysane‘ सुरु करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्याकाळी जेव्हा देशात YouTube चॅनल आणि कंटेन्ट क्रिएशनचे कॉन्सेप्ट एक नवा प्रकार होता. तिच्या ऑर्गेनिक कंटेन्टने खास करुन तरुणांमध्ये वेगाने प्रसिद्ध झाली. पाहाता पाहाता तिचे सब्सक्राईबर्सची संख्येत वाढ झाली. आज युट्युबचे ७.२९ दशलक्ष सब्सक्रायबर आहेत. इंस्टाग्रामवर तिचे सुमारे ८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
येथे पोस्ट पाहा –
View this post on Instagram
प्राजक्ता कोळीचे यूट्यूबपासून किती कमाई
प्राजक्ता कोळी चित्रपट, टीव्ही शो,ब्रँड एंडोर्समेंट आणि तिच्या युट्युब चॅनलद्वारे कमाई करते. लाईफस्टाईल एशियाच्या वृत्तानुसार प्राजक्ता युट्युबद्वारे दर महिन्याला सुमारे ४० लाख रुपये कमावते. प्राजक्ता चित्रपट आणि टीव्ही शोद्वारे सुमारे ३० लाख फि वसुल करते. २०२४ तिची नेटवर्थ सुमारे १६ कोटी रुपये होती असे म्हटले जाते. साल २०२२ मध्ये तिची संपत्ती १४ कोटी रुपये होती आणि २०२१ मध्ये सुमारे १० कोटी रुपये होती. तिची वाढती संपत्ती तिच्या लोकप्रियतेची साक्ष आहे.
प्राजक्ताची गुंतवणूक
प्राजक्ता कोळी हिने अनेक गुंतवणूकी केल्या आहेत. प्राजक्ताने २०१९ मध्ये मुंबईत ५० लाखाचा एक अपार्टमेंट खरेदी केला आहे. तिच्याकडे टोयोटा फॉर्च्युनर कार आहे. या कारची किंमत ४० लाख रुपये आहे. तिला जगभरातील लग्झरी डिस्टीनेशनवर व्हेकशन एन्जॉय करताना पाहीले आहे.
प्राजक्ताने चित्रपट आणि मालिकेतही
प्राजक्ताने साल २०२० मध्ये आलेली शॉर्ट फिल्स ‘खयाली पुलाव’ मधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. नेटफ्लिक्सच्या रोमांटिक सिरीज ‘मिसमॅच्ड’ मध्ये तिच्या अभिनयाने तिच्याकडे सर्वांचे लक्ष गेले. तिच्या अभिनयालाच नव्हे तर चाहत्यांनी तिच्या को-स्टार रोहित सराफ याच्याशी तिच्या केमिस्ट्रीलाही पसंद केले. तिने २०२२ मध्ये चित्रपट ‘जुग जुग जिओ’ मध्ये अनिल कपूर,नीतू कपूर, वरुण धवन आणि कियारा आडवाणी सोबत काम केले. २०२३ मध्ये मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट ‘नीयत’ मध्ये विद्या बालन सोबत काम केले.
