4 लाख मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता, 12 लाख गरोदर महिलांवरही संकट, UN चा गंभीर इशारा

संयुक्त राष्ट्रसंघाने यमेनमध्ये राहणाऱ्या मुलांबद्दल चिंता व्यक्त केलीय. संयुक्त राष्ट्राच्या (UN) अहवालानुसार या वर्षात 20 लाखांपेक्षा अधिक लहान मुलांच्या जीवाला धोका आहे.

4 लाख मुलांचा मृत्यू होण्याची शक्यता, 12 लाख गरोदर महिलांवरही संकट, UN चा गंभीर इशारा
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 5:29 PM

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाने यमेनमध्ये राहणाऱ्या मुलांबद्दल चिंता व्यक्त केलीय. संयुक्त राष्ट्राच्या (UN) अहवालानुसार या वर्षात 20 लाखांपेक्षा अधिक लहान मुलांच्या जीवाला धोका आहे. ते युद्धजन्य परिस्थितीत कुपोषणाचे शिकार होण्याची शक्यता आहे. 5 वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुलं कुपोषणाच्या केंद्रस्थानी येण्याचा धोका आहे. त्यामुळेच संयुक्त राष्ट्राने अनेक वर्षांपासून यमेनमध्ये सुरु असलेल्या युद्धातील सर्वांना युद्ध संपवण्याची विनंती केलीय. युद्धामुळे यमेन दुष्काळाच्या उंबरठ्यावर पोहचलाय. यात सर्वात जास्त नुकसान लहानं मुलं आणि महिलांचं होत आहे (20 lakh children’s could affect by starvation in Yemen says United Nations).

संयुक्त राष्ट्राच्या अहवालात जगाला अनेक इशारे देण्यात आले आहेत. यात म्हटलं आहे, “प्रत्येकी सहापैकी एका मुलाचा मृत्यू (23 लाखांपैकी 4 लाख मुलांचा मृत्यू) कुपोषणामुळे होण्याची भीती आहे. हा आकडा मागील वर्षापेक्षा खुप जास्त आहे. यमेन देशात निधीच्या अभावामुळे संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार कार्यक्रमांवर वाईट परिणाम झालाय. संयुक्त राष्ट्राला आर्थिक मदत करणाऱ्या देणगीदार देशांनी दिलेलं वचन पूर्ण न केल्याने मोठी आर्थिक तूट निर्माण झालीय, असंही संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालात संकटाची तीव्रता सांगताना यमेनमधील जवळपास 12 लाख गर्भवती आणि स्तनदामाता सुद्धा कुपोषणाच्या शिकार होण्याची भीती व्यक्त केली आहे.

यमेनच्या उत्तरेकडील बहुतांश भागात 2014 पासून युद्ध

यमेनमधील अनेक भागांवर आजही हुती बंडखोरांचं नियंत्रण आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक खाद्य कार्यक्रम, खाद्य कृषी संघटना, युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त अहवालात अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आलाय. यमेनची राजधानी सना आणि यमेनच्या उत्तरेकडील बहुतांश भागात 2014 पासून इराणचा पाठिंबा मिळालेल्या हुती बंडखोरांनी ताबा मिळवलाय. त्यांच्या विरोधात सौदी अरबच्या नेतृत्वात सैन्य कारवाई अजुनही सुरु आहे. या भागात युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेची मोठी घोषणा

अमेरिकेत जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर यमेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्याच्या दिशेने पाऊल उचललं आहे. यानुसार अमेरिका सौदी अरबला यमेनमध्ये देण्यात येणारी मदत बंद करत आहे. यात सौदी अरबला केल्या जाणाऱ्या शस्त्रविक्रीचाही समावेश आहे. असं असलं तरी अमेरिका आपलै सौदी अरबसोबतचे इतर संबंध कायम ठेवेल आणि त्यांना मदत करेल असंही बायडन सरकारने सांगितलंय. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनी अमेरिकेचे परराष्ट्रा मंत्री एन्टोनी ब्लिकन यांच्यासोबत फोनवर चर्चा केलीय. यात यमेनसोबत जगभरातील चिंताजनक परिस्थितीवर चर्चा झाली.

हेही वाचा :

आत्ताच निश्चिंत होऊ नका, पुढील वर्षीची परिस्थिती यापेक्षाही खराब असू शकते, नोबेल विजेत्या WFP चा इशारा

व्हिडीओ पाहा :

20 lakh children’s could affect by starvation in Yemen says United Nations

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.