AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 वर्षांच्या मॉडेलने घेतलं मिल्क इंजेक्शन ! 18 दिवस कोमात, अखेर मृत्यू.. नेमकं काय घडलं ?

मॉडेलला निद्रानाशाची समस्या होती, ज्यासाठी ती थेरपीसाठी गेली. मात्र तिथे असं काही झालं की त्या मॉडलेचा जीवच गेला. नेमकं झालं तरी काय ?

30 वर्षांच्या मॉडेलने घेतलं मिल्क इंजेक्शन ! 18 दिवस कोमात, अखेर मृत्यू.. नेमकं काय घडलं ?
| Updated on: Jun 24, 2025 | 1:07 PM
Share

एका मॉडेलच्या दुःखद मृत्यूमुळ् सोशल मीडियावर सध्या संताप आणि दुःखाची लाट पसरली आहे. या ३० वर्षीय मॉडेलला निद्रानाशाची समस्या होती, ज्यासाठी ती एका प्रसिद्ध डॉक्टरांकडून उपचार घेत होती. उपचाराचा एक भाग म्हणून डॉक्टरांनी तिला ‘मिल्क इंजेक्शन’ दिलं, पण तेच घातक ठरलं. इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरांनी तिला नवशिक्या सहाय्यकाच्या देखरेखीखाली सोडले. मात्र त्यानतर, मॉडेलची प्रकृती इतकी बिघडली की तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिला लाईफ सपोर्टवर ठेवावे लागले. अखेर 18 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यामॉडेले अखेरचा अशवास घेतला.तिच्या मृत्यीमुळे आता इंजेक्शन देणारा डॉक्टर कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या मॉडेलचे नाव कै युक्सिन होते, ती तैवानमध्ये होणाऱ्या कार शोमध्ये मॉडेलिंग करायची. 5 फूट 7 इंच उंचीची कै युक्सिन खूपच सुंदर होती आणि लोक तिची तुलना तैवानी अभिनेत्री लिन ची-लिंगशी करत होते. 30 वर्षांच्या या मॉडेलची सोशल मीडियावर बरेच चाहते आहेत आणि 32 हजारांहून अधिक लोक तिला फेसबुकवर फॉलो करतात.

सतावत होती निद्रानाशाची समस्या

रिपोर्टनुसार, युक्सिन ही अनक दिवसांपासून निद्रानाशाच्या अर्थात झोप न येण्याच्या समस्येशी झुंज देत होती. एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार, तिने स्लीप थेरपी घेण्याचा निर्णय घेतला आणि 25 मे रोजी फेरी क्लिनिकमध्ये गेली. येथे क्लिनिकचे संचालक आणि सुप्रसिद्ध कॉस्मेटिक डॉक्टर वू शाओहू यांनी तिची थेरपी सुरू केली आणि तिला मिल्क इंजेक्शन दिले. डॉ. वू शाओहू यांना तैवानमध्ये लाइपोसक्शनचे गॉडफादर म्हणून ओळखले जाते.

मात्र युक्सिनला मिल्क इंजेक्शन दिल्यानंतर तिला एका नवशिक्या असिस्टंटवर सोपवून डॉ वू शाओहू हे क्लिनिकमधून निघून गेले. धक्कादायक गोष्ट म्हणजे या सहाय्यकाकडे नर्सिंग लायसन्सही नव्हता. मात्र काही वेळानंतर, युक्सिनची तब्येत बिघडू लागली आणि तिचा श्वास थांबला. तेथील सहाय्यकाने ताबडतोब डॉक्टरांना फोन केला आणि त्यांनी तिला व्हिडिओ कॉलद्वारे सीपीआर देण्यास सांगितले.

युक्सिनची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टर वू शाओहू हे स्वतः देखील क्लिनिकमध्ये परतले, परंतु युक्सिनला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथे तिला लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. तिथे युक्सिन ही 18 दिवस कोमामध्ये होती. अखेर 12 जून रोजी, तिच्या कुटुंबाने लाईफ सपोर्ट काढून टाकण्याचा दुःखद आणि कठीण निर्णय घेतला, त्यानंतर युक्सिनचे निधन झाले.

मिल्क इंजेक्शन म्हणजे काय ?

प्रोपोफोल नावाच्या भूल देणाऱ्या इंजेक्शनचे टोपणनाव मिल्क इंजेक्शन आहे. हे एक शक्तिशाली भूल देणारे इंजेक्शन आहे, त्याच्या दुधाळ रंगामुळे त्याला मिल्क इंजेक्शन असे नाव देण्यात आले आहे.

डॉक्टरवर होणार केस ?

आता पोलिस अधिकाऱ्यांनी डॉ. वू शाओहू यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाने गंभीर दुखापत करणे आणि वैद्यकीय सेवा कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली चौकशी सुरू केली आहे. प्रोपोफोल हे तैवानमध्ये नियंत्रित औषध आहे जे फक्त व्यावसायिक डॉक्टरच देऊ शकतात. योग्य काळजी न घेता ते वापरणे धोकादायक आणि वैद्यकीय नीतिमत्तेच्या विरुद्ध असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

मायकल जॅक्सनचाही असाट मृत्यू

वैद्यकीय निष्काळजीपणामुळे सेलिब्रिटींचे मृत्यू होणे ही काही नवीन गोष्ट नाही. पॉप आयकॉन मायकल जॅक्सनसोबतही अशीच एक घटना घडली होती, त्यालाही निद्रानाशाचा त्रास होता. 50 वर्षीयय मायकल जॅक्सनलाही निद्रानाशाचा त्रास होता आणि तो शेवटच्या काळात औषधांवर जगत होता. 2011 मध्ये, मायकल जॅक्सनचे वैयक्तिक डॉक्टर कॉनराड मरे यांनी त्यांना औषधांचा जास्त डोस दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. न्यायालयाने डॉ. मरे यांना दोषी ठरवले.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.